साताऱ्याच्या डॉक्टर महिलेच्या डायरीत 'राज की बात',फलटण पोलीसांच्या हाती मोठा पुरावा; खुलासा होणार

Last Updated:

डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.

satara Doctor diary
satara Doctor diary
सातारा :  फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.  साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बनकरसह पीएसआय बदने आणि मृत महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच बदनेसोबत महिला डॉक्टरचे एकमेबरोबर फोनवर बोलणं झाल्याचही उघड झालं आहे. डॉक्टर तरुणीचे आरोपीसोबतचे चॅटही सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एवढच नाही तर पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला असून डॉक्टर तरुणीच्या घरातून डायरी सापडली आहे.
फलटण डॉक्टर महिला प्रकरणात आतापर्यंत रोज नवनवे खुलासे होत आहे. दरम्यान पोलिसांनी घराची झाडाझडती घेतल्यानंतर तिच्या घरी अनेक पुरावे सापडले. डॉक्टर तरुणीला डायरी लिहिण्याची सवय होती. या महिला तरुणीला देखील दैनंदिनी लिहण्याची सवय होती. त्या डायरीमध्ये पीएम नोट (पोस्टमार्टेम नोट) लिहित होती. याशिवाय वैयक्तिक माहितीदेखील या डायरीत लिहित होती. त्यामुळे या डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   दरम्यान पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.
advertisement
वैद्यकीय क्षेत्रात या नोटला (शवविच्छेदन) महत्त्व आहे. एखादा मृतदेह रुग्णालयात आल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, अंगावरील जन्मजात खुना व नव्याने काही व्रण, खुना आहेत का? याची सविस्तर माहिती दिली जाते. तसेच पोस्ट मार्टम केल्यानंतर मृत्यूचे प्राथमिक कारण काय? अशी सर्व माहिती यामध्ये असते. सध्या डायरी लिहण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे
advertisement

डायरीमध्ये नेमकं काय?

मुंडे या स्वतःची एक दैनंदिनी लिहीत होत्या. ही बाब वैद्यकीय क्षेत्रात आता दुर्मीळ यासाठी डॉ. संपदा झाली आहे. मात्र डॉक्टर तरूणीने आजही ती जपल्याचे रुग्णालयातील सहकारी सांगतात.वैयक्तिक असलेल्या या डायरीमध्ये त्यांनी आतापर्यंत केलेल्या पोस्ट मार्टमची माहिती आहे. तसेच काही खासगी आयुष्याविषयी लिहिले आहे.

डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता

advertisement
पीडित महिला डॉक्टरवर खोटे पीएम रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात होता. तिने अनेकदा याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही राजकीय आणि पोलिसांकडून तिच्यावर दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप पाहाता साताऱ्यातील मृत महिला डॉक्टरच्या डायरीमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साताऱ्याच्या डॉक्टर महिलेच्या डायरीत 'राज की बात',फलटण पोलीसांच्या हाती मोठा पुरावा; खुलासा होणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement