Who is Anaconda : अनाकोंडा नक्की कोण आहे? तो कुठे आढळतो आणि किती धोकादायक! तुम्हाला 'या' गोष्टी माहितच नसणार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
साप आणि अजगरासोबत आणखी एका सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल बोललं जातो, तो म्हणजे अनाकोंडा (Anaconda). पण त्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे.
साप पाहिला की लोकांच्या मनात धडकी भरते, त्याचा दंश माणसाला मारायला पुरेसं असतात. त्यामुळे लोक त्याच्यापासून लांब रहातात, पण असं असलं तरी लोकांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. सापाबरोबरच अजगर देखील तेवढात धोकादायक आहे. कारण तो थेट कोणालाही गिळू शकतो. आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या प्राण्यालाही तो खातो, पण जेव्हा पचत नाही तेव्हा तो त्यांना बाहेर देखील काढतो. पण तोपर्यंत तो प्राणी किंवा जीव मेलेला असतो. साप आणि अजगरासोबत आणखी एका सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल बोललं जातो, तो म्हणजे अनाकोंडा (Anaconda).
advertisement
सिनेमामध्ये अनेकांनी अनाकोंडा (Anaconda) ला पाहिला असेल. त्यांच्या अफाट आकारामुळे आणि शक्तीमुळे लोकांमध्ये नेहमीच कौतुक आणि भीती निर्माण करतात. कारण अनाकोंडा (Anaconda) माणसाला देखील गिळू शकतो. सिनेमात तुम्ही हे पाहिलं असेन आणि खऱ्या आयुष्यात त्याबद्दल ऐकलं ही असेल. पण त्याच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. अनाकोंडा म्हणजे कोण? तो कुठे असतो? तो किती धोकादायक असतो वैगरे... वैगरे....
advertisement
advertisement
advertisement
advertisement
किती धोकादायक आहे अनाकोंडा?लोकांच्या मनात अनाकोंडाबद्दल अनेक गैरसमज आहेत. चित्रपटांमुळे तो मनुष्यांना सहज गिळतो असं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात अनाकोंडा फार क्वचितच मनुष्यांवर हल्ला करतो. तरीही, तो अतिशय बलवान आहे. आपल्या शिकाराभोवती गुंडाळून त्याचा श्वास रोखून तो आपल्या शिकाराला गिळतो. त्यामुळे तो धोकादायक तर आहेच, पण मनुष्यांसाठी फारसा आक्रमक नसतो.
advertisement
तो काय खातो?अनाकोंडा मांसाहारी आहे. तो मगर, हरिण, पक्षी, डुक्कर, अगदी इतर सापांनाही खातो. शिकार मिळाल्यावर तो त्याला एका झटक्यात पकडतो, घट्ट गुंडाळतो आणि नंतर पूर्णपणे गिळून टाकतो. त्याचं पचन खूप हळू होतं, त्यामुळे तो अनेक दिवस काहीही खात नाही. म्हणजेच त्याने एकदा पोटभर खाल्लं तर तो अनेक महिने काही खात नाही.
advertisement
आयुष्य किती असतं?अनाकोंडाचं आयुष्य सुमारे 10 ते 30 वर्षांपर्यंत असतं. कैदेत ठेवलेले साप थोडं जास्त काळ जगतात, कारण त्यांना अन्न आणि सुरक्षित वातावरण सहज मिळतं. अनाकोंडा म्हणजे निसर्गाचं एक अद्भुत उदाहरण सामर्थ्य, शांतता आणि संयम यांचं प्रतीक. तो भीतीचा नव्हे, तर निसर्गाच्या संतुलनाचा भाग आहे. म्हणून पुढच्यावेळी “अनाकोंडा” हे नाव ऐकलंत, तर घाबरू नका फक्त निसर्गाच्या या महाकाय रहस्याला सलाम करा.


