IND vs PAK : पाकिस्तानी कॅप्टनची एक चूक ठरली गेम चेंजर, कॅप्टन सूर्याने सांगितलं विजयाचं सिक्रेट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताने दिलेल्या 176 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 18 ओव्हरमध्ये फक्त 114 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला जो चुकीचा ठरला. सूर्याने टॉसवेळीच आपण टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घेतली असती, असं स्पष्ट केलं. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही पहिले बॅटिंग करूनच जिंकलो आहे, त्यामुळे आम्ही आताही बॅटिंगच घेतली असती, असं म्हणत सूर्याने टीमचे विचार किती स्पष्ट आहेत, ते दाखवून दिलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement






