advertisement

अखेर 'शेवंता' अडकली लग्नाच्या बेडीत! व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर अपूर्वा नेमळेकरचं सरप्राइज; प्रेमाला दिला दुसरा चान्स

Last Updated:

Apurva Nemalekar Marriage: अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला गुपचूप लग्न केले. तिने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या लग्नाची माहिती दिली आहे.

News18
News18
मुंबई : मराठी रसिक प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आणि 'रात्रीस खेळ चाले' मधील 'शेवंता' म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने चाहत्यांना एक जबरदस्त सरप्राईज दिलं आहे. १४ फेब्रुवारी, म्हणजेच जगभरात प्रेमाचा उत्सव साजरा होत असताना अपूर्वाने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करताच चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून, आता अपूर्वा अधिकृतपणे 'मिसेस गोवलकर' झाली आहे.

अपूर्वाने तनुज गोवलकरशी बांधली लग्नगाठ

अपूर्वाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत आपला जोडीदार तनुज गोवलकर याची जगाशी ओळख करून दिली आहे. तिने केवळ फोटोच शेअर केले नाहीत, तर आपल्या नावापुढे 'गोवलकर' हे आडनाव जोडून एका नव्या प्रवासाची ग्वाही दिली आहे. अपूर्वाने आपल्या पोस्टमध्ये अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना मांडल्या आहेत.
advertisement
अपूर्वाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "१४ फेब्रुवारी २०२६ - ही तारीख आता आमची कायमची झाली आहे. आयुष्यभर साथ देणाऱ्या एका नवीन प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे. खूप संघर्ष पाहिला, आयुष्य कसं असतं हे अनुभवलं, पण प्रेमावरचा विश्वास मी कधीच ढळू दिला नाही. वादळानंतर देवाने मला जी शांतता आणि सोबत दिली, ती म्हणजे तनुज! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मला माझं घर सापडलं."
advertisement

प्रेमाला दिला दुसरा चान्स

अपूर्वाचं हे दुसरं लग्न आहे. तिने आपल्या पहिल्या लग्नातील कटू अनुभव आणि त्यानंतर झालेला मानसिक त्रास यावर अनेकदा मुलाखतींमधून भाष्य केलं होतं. पण "योग्य वेळ आणि योग्य माणूस भेटल्यावर नक्की विचार करेन," असंही ती नेहमी म्हणायची. अपूर्वाने तनुजसोबतचं हे नातं अत्यंत समजूतदारपणाने आणि एकमेकांबद्दलच्या आदराने स्वीकारलं आहे. तिने आपल्या पोस्टच्या शेवटी 'Mrs. Apurva Tanuj Govalkar' असं लिहित आपल्या आनंदाला वाट करून दिली आहे.
advertisement
advertisement

कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अपूर्वाच्या लग्नाची बातमी कळताच सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. बिग बॉस मराठीमधील तिचे सहकारी असोत किंवा मालिकेतील सहकलाकार, सर्वांनीच तिला कमेंट्स सेक्शनमधून प्रेम दिलं आहे. अपूर्वा आता खऱ्या अर्थाने आनंदी दिसत असून, तिची ही नवी इनिंग यशस्वी होण्यासाठी चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अखेर 'शेवंता' अडकली लग्नाच्या बेडीत! व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर अपूर्वा नेमळेकरचं सरप्राइज; प्रेमाला दिला दुसरा चान्स
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement