ईशानने कोणाला जमले नाही ते करून दाखवले, भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला; टी-20मध्ये झाला नवा रेकॉर्ड
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अभिषेक बाद झाल्यानंतर ईशान किशनने भारताचा डाव सावरला आणि पहिल्या बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती.
Ishan Kishan, India vs Pakistan : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सूरू असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशनने वादळी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने 40 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 192 होता. दरम्यान या सामन्यात आतापर्यंत ईशानच अख्ख्या पाकिस्तानी टीमला एकटा पूरून उरल्याचे दिसते आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती.टीम इंडियाकडून ईशान किशन आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले होते. यावेळी अभिषेक शर्मा मोठी खेळी करले अशी अपेक्षा होती. पण तो शुन्यावर बाद झाला.त्याच्यानंतर तिलक वर्मा बाद झाला होता.
अभिषेक बाद झाल्यानंतर ईशान किशनने भारताचा डाव सावरला आणि पहिल्या बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती. या दरम्यान त्याने एकट्याने पॉवरप्लेमध्ये पॉवर हिंटींग करत भारताला 52 धावा करून दिल्या होत्या.त्यातल्या 42 धावा एकट्या ईशानच्या होत्या. शुभमन गिलने आशिया कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध 35 धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड देखील त्याने मोडला.
advertisement
त्यानंतर ईशान किशनने पॉवर प्लेनंतर तडाखेबाज खेळी सूरूच ठेवली.त्यानंतर तो 40 बॉलमध्ये 77 धावा करून बाद झाला होता. ईशान जेव्हा बाद झाला तेव्हा भारताच्या 8.4 ओव्हरमध्ये 88 धावा झाल्या होत्या. त्यातल्या 77 धावा एकट्या ईशानने केल्या होत्या.
INDIA VS PAKISTAN सामन्यात फास्टेट फिफ्टी
२३ मोहम्मद हाफीज अहमदाबाद २०१२
२४ अभिषेक शर्मा दुबई २०२५
advertisement
२७ इशान किशन कोलंबो आरपीएस २०२६
२९ युवराज सिंग अहमदाबाद २०१२
भारत-पाकिस्तान टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा
८२* विराट कोहली मेलबर्न २०२२
७९* मोहम्मद रिझवान दुबई २०२१
७८* विराट कोहली कोलंबो आरपीएस २०१२
७७ इशान किशन कोलंबो आरपीएस २०२६
७५ गौतम गंभीर जोबर्ग २००७
दरम्यान हा रेकॉर्ड पाहता पाकिस्तान विरूद्ध सर्वाधिक धावा ठोकण्याच्या रेकॉर्डमध्ये अभिषेक शर्माने गौतम गंभीरला मागे टाकले आहे.गंभीरने 75 सर्वाधिक धावा केल्या होत्या. ईशानने त्याच्यापेक्षा दोन धावा जास्त करून रेकॉर्ड मोडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 7:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ईशानने कोणाला जमले नाही ते करून दाखवले, भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला; टी-20मध्ये झाला नवा रेकॉर्ड









