advertisement

Special Report: पुण्यात भाजप-काँग्रेस भिडले, आंदोलनादरम्यान जोरदार राडा

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 20:36 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूकडील पदाधिकारी एकमेकांसमोर आले.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगड भिरकावल्याचा आरोप करण्यात येतो आहे. झालेल्या दगडफेकीत एक-दोन काँग्रेस कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: पुण्यात भाजप-काँग्रेस भिडले, आंदोलनादरम्यान जोरदार राडा
advertisement
advertisement
advertisement