advertisement

मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर उभारणार Emergency Medical Room, गरजू प्रवाशांना होणार तात्काळ मदत

Last Updated:

Thane Railway Station At Emergency Room: मध्य रेल्वेने मुंबई विभागातील अनेक उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Thane Railway Station At Emergency Room
Thane Railway Station At Emergency Room
मध्य रेल्वेने मुंबई विभागातील अनेक उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 10 महत्त्वाच्या स्थानकांसाठी ई-लिलाव प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर, 8 अतिरिक्त स्थानकांसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन परिसरात दुखापत, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा आरोग्यविषयक अडचणीत असलेल्या प्रवाशांना त्वरित प्रथमोपचार आणि जलद वैद्यकीय मदत प्रदान करण्यासाठी या सुविधांचा उद्देश आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या 10 स्थानकांसाठी ई- लिलावाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्यामध्ये, कळवा, टिटवाळा, कर्जत, कुर्ला, ठाणे, मुंब्रा, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांचा समावेश आहे.
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकदा की आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू झाले की, प्रत्येक ठिकाणी मूलभूत लाईफ सपोर्ट मशीन, ऑक्सिजन पुरवणारी मशिन, स्ट्रेचर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तिथे कायम उपलब्ध असतील. या उपक्रमामुळे अपघात, हृदयविकाराच्या घटना आणि गर्दीच्या ठिकाणी अचानक उद्भवणाऱ्या आजारांच्या घटनांमध्ये प्रतिसादाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
advertisement
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांनी नमूद केले की, ही योजना मुंबई उपनगरीय सेवेमध्ये राबवल्या जाणाऱ्या व्यापक प्रवासी सुरक्षा आणि प्रवासी कल्याण उपक्रमाचा एक भाग आहे. दररोज सुमारे 35 ते 40 लाख प्रवासी प्रवास करत असल्याने, स्थानकांवर त्वरित वैद्यकीय सेवा मिळणे ही एक महत्त्वाची गरज म्हणून ओळखली गेली आहे. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर, मध्य रेल्वे उपनगरीय कॉरिडॉरच्या मोठ्या भागामध्ये स्थानक परिसरात आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे गंभीर घटनांमध्ये वाचण्याची शक्यता वाढेल आणि बाह्य रुग्णवाहिकेच्या आगमन वेळेवरील अवलंबित्व कमी होईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर उभारणार Emergency Medical Room, गरजू प्रवाशांना होणार तात्काळ मदत
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement