IND vs PAK : पाकिस्तानच्या कर्णधाराचा मुर्खपणा, ट्रम्पकार्डच वापरलं नाही, 5 कारणामुळे रायव्हरली 8-1 झाली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 18 ओव्हरमध्ये 114 धावांवर ऑलआऊट झाली होती.
advertisement
advertisement
पाकिस्तानने अभिषेक शर्माची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढून मॅच अर्धी इथेच जिंकली होती. पण कॅप्टन सलमान आगाने पुढे जाऊन मोठी चूक केली. ही चूक म्हणजे सलमान आघाने त्याचा ट्रम्प कार्ड वापरला नाही. उस्मान तारीकला पहिल्या 10 ओव्हरमध्ये गोलंदाजीच दिली नाही. जर पहिल्या 10 ओव्हरला उस्मान तारीक आला असता तर कदाचित थोडं चित्र वेगळं असतं.
advertisement
कॅप्टन सलमान आघाने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली.त्याने फक्त 2 ओव्हर टाकल्या त्यात त्याने 10 धावा काढून एक विकेट घेतली. पण त्याने आणखीण दोन ओव्हर टाकणे अपेक्षित होते. पण ते न करता त्याने शाहिद आफ्रिदीला ओव्हर दिली. आगाच्या निर्णयाने शाहिन आफ्रिदीच्या ओव्हरमध्ये भारताला गिफ्टमध्ये 16 धावा मिळाल्या.त्यामुळे भारत 175 धावा गाठू शकली होती.
advertisement
पाकिस्तानचा एकच खेळाडू असा होता जो भारतीय गोलंदाजांविरूद्ध चांगली फलंदाजी करत होता तो म्हणजे उस्मान खान. उस्मान खानने पाकिस्तानकडून 34 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने एक षटकार आणि 6 चौकार मारले. त्यामुळे त्याने मैदानात टीकून खेळणे अपेक्षित होते. पण त्याने एक चुकीचा शॉर्ट खेळला आणि घात झाला.
advertisement
या सामन्यात ज्या प्रमाणे पाकिस्तानने गोलंदाजी केली ते पाहता भारत फारशा धावा करू शकणार नाही असे वाटक होते. पण ईशानच्या 77 धावांच्या खेळीमुळे भारत 175 धावापर्यंत मजल मारू शकला होता. यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान प्रेशरमध्ये गेली आणि एका मागून एक विकेट फेकत 18 ओव्हरमध्ये 114 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे भारताने हा सामना 60 धावांनी जिंकला.










