IND vs PAK : उभंही राहता येईना, विव्हळतच मैदानात झोपला, तरी टीमसाठी झुंजला, इशानचा हार्ट टचिंग Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 61 रननी दणदणीत विजय झाला आहे. इशान किशन हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 61 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 176 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 114 रनवर ऑलआऊट झाला आहे. कोलंबोच्या कठीण खेळपट्टीवर एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानला पहिल्या ओव्हरपासूनच धक्के बसले. हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर मेडन टाकून एक विकेटही मिळवली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये बुमराहने 2 विकेट घेतल्या.
पहिल्या दोन ओव्हरमध्येच 3 विकेट गेल्यानंतर पाकिस्तान यातून सावरू शकली नाही. भारताकडून हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.
भारतीय बॉलर्सनी उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो इशान किशन. पहिले बॅटिंग करताना टीम इंडियाने पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्माची विकेट शून्य रनवर गमावली, त्यानंतरही एवढ्या तणावाच्या सामन्यात इशान किशन डगमगला नाही आणि त्याने पाकिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.
advertisement
Ishan was in pain but the way Siraj placed a towel under his head and gently dusted the dirt off afterward Siraj cutie ️ pic.twitter.com/3hIFlH7ntf
— PK (@PK23032) February 15, 2026
इशान किशनने 40 बॉलमध्ये 192.50 च्या स्ट्राईक रेटने 77 रनची खेळी केली, ज्यात 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू संघर्ष करत असताना इशान किशनने एकट्याने किल्ला लढवला. श्रीलंकेमधल्या वातावरणामुळे इशान किशनचं पूर्ण शरीर घामाने भरलं होतं, एवढंच नाही तर त्याच्या शरिरातली उर्जाही कमी झाली होती.
advertisement
ड्रिंक्स ब्रेकमध्ये इशान किशन हा त्रासाने विव्हळत होता, एवढच नाही तर तो मैदानामध्येच काही क्षण आडवा झाला, त्यानंतर एनर्जी ड्रिंक घेऊन इशान पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तयार झाला. इशान किशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तसंच टीमसाठी कठीण परिस्थितीमध्येही उभा राहिल्यामुळे क्रिकेट चाहते इशान किशनचं कौतुक करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 11:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : उभंही राहता येईना, विव्हळतच मैदानात झोपला, तरी टीमसाठी झुंजला, इशानचा हार्ट टचिंग Video








