IND vs PAK : 32 तासांची फिल्म बनवायला निघाला, 32 सेकंदही टिकला नाही, फरहानची जगासमोर लाज गेली
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 61 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेलं 176 रनचं आव्हान पार करायला आलेल्या पाकिस्तानचा 18 ओव्हरमध्ये फक्त 114 रनवर ऑल आऊट झाला.
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 61 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेलं 176 रनचं आव्हान पार करायला आलेल्या पाकिस्तानचा 18 ओव्हरमध्ये फक्त 114 रनवर ऑल आऊट झाला. आशिया कपमध्ये वादग्रस्त एके-47 रायफलचं सेलिब्रेशन करणारा साहिबजादा फरहान तर या सामन्यात फक्त शून्य रनवर आऊट झाला. हार्दिक पांड्याने फरहानची पहिल्याच ओव्हरला विकेट घेतली.
आशिया कपमध्ये बुमराहला सिक्स मारल्यानंतर साहिबजादा फरहानचा पाकिस्तानमध्ये सत्कार केला गेला. एवढच नाही, तर त्याच्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवली गेली. टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना साहिबजादा फरहान बाऊंड्रीजवळ फिल्डिंगला उभा होता, तेव्हा एका पाकिस्तानी चाहता फरहानला बुमराहला इतक्या सिक्स मार की 32 तासांची फिल्म बनवू, असं म्हणाला. यानंतर साहिबजादा फरहानने होकारार्थी मान हलवली, पण बॅटिंगला येताच फरहान एकही रन न करता आऊट झाला.
advertisement
176 रनचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानला सुरूवातीपासूनच धक्के लागले. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नवा बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला आणि यानंतर हार्दिकने पहिलीच ओव्हर मेडन टाकली. सुरूवातीच्या 3 बॉलला एकही रन न आल्यामुळे साहिबजादा फरहानचा संयम सुटला आणि त्याने आडवा शॉट मारला, पण बॉल मिड ऑनवर उभ्या असलेल्या रिंकू सिंगच्या हातात गेला. फरहानची विकेट गेल्यानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे.
advertisement
Haramzada Farhan pic.twitter.com/bH65V4sb49
— Crazy Cricket Memes (@CrazyCricMemes) February 15, 2026
32 तासांचा चित्रपट बनवण्याचं स्वप्न बघणारा साहिबजादा फरहान 32 सेकंदही विकेटवर टिकला नाही, अशा खोचक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. बुमराहला सिक्स मारणार होता, पण बुमराहची बॉलिंग यायच्या आधीच पॅव्हेलियनमध्ये गेला, अशी टीकाही भारतच नाही तर जगभरातले चाहते फरहानवर करत आहेत.
advertisement
इशान किशन हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. इशान किशनने 40 बॉलमध्ये 192.50 च्या स्ट्राईक रेटने 77 रनची खेळी केली, ज्यात 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. त्यानंतर भारतीय बॉलर्सनीही उत्कृष्ट कामगिरी केली. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी 1-1 विकेट घेतली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 11:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 32 तासांची फिल्म बनवायला निघाला, 32 सेकंदही टिकला नाही, फरहानची जगासमोर लाज गेली







