बालकांसाठी स्पेशल आहे NPS वात्सल्य योजना! आज होणार लॉन्च, पाहा डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
NPS Vatsalya scheme Details : या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची लिमिट नाही. मूल 18 वर्षांचे झाल्यावर NPS 'वात्सल्य' सुद्धा NPS योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते.
नवी दिल्ली : 2024 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने NPS वात्सल्य योजना जाहीर केली होती. ही योजना आज सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ करणार आहेत. अर्थमंत्री एनपीएस वात्सल्य सदस्यता म्हणजेच सब्सक्रिप्शन घेण्यासाठी पोर्टल लॉन्च करतील. यावेळी, त्या योजनेशी संबंधित एक माहितीपत्रकही जारी करतील, ज्यामध्ये NPS वात्सल्यबद्दल संपूर्ण डिटेल्स असतील.
NPS वात्सल्य योजना ही पेन्शन व्यवस्थेतील एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. योजनेचे व्यवस्थापन प्रबंधन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या हातात असतील. NPS वात्सल्य योजना आई-वडील आणि पालकांना पेन्शन खात्यात गुंतवणूक करून त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी निधी उपलब्ध करून देईल.
advertisement
1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू होईल
NPS-वात्सल्य योजनेअंतर्गत, आई-वडील किंवा पालक मुलाच्या नावावर किमान 1000 रुपयांपासून अकाउंट उघडू शकतील. त्यानंतर, 18 वर्षे वयापर्यंत, आई-वडील किंवा पालकांना दरवर्षी मुलाच्या NPS-वात्सल्य अकाउंटमध्ये किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. SBI पेन्शन फंड प्लॅटफॉर्मनुसार, या अकाउंटमध्ये जास्तीत जास्त जमा करण्याची कोणतीही लिमिट नाही. मूल 18 वर्षांचे झाल्यावर NPS ‘वात्सल्य’ सुद्धा NPS योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते.
advertisement
अकाउंट कोण उघडू शकतो
सर्व आई-वडील आणि पालक, मग ते भारतीय नागरिक, NRI किंवा OCI असोत, त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी NPS वात्सल्य अकाउंट उघडू शकतात. NPS वात्सल्य हे लहान मुले मोठी झाल्यावर त्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पालक त्यांच्या मुलांच्या वतीने या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जेव्हा मूल मोठे होईल तेव्हा अकाउंट नियमित NPS मध्ये रूपांतरित केले जाईल. खात्यात जमा केलेल्या पैशावर तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळेल.
advertisement
पैसे काढण्याचीही सोय
view commentsमुलाचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच आई-वडील किंवा पालक NPS-वात्सल्य योजनेत उघडलेल्या अकाउंटमधून पैसे काढू शकतील. NPS वात्सल्य योजनेंतर्गत, मुलाच्या नावाने उघडलेल्या अकाउंटमध्ये जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 25% रक्कम काढण्याची परवानगी असेल, म्हणजे अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून 3 वर्षानंतरचे योगदान. मूल 18 वर्षांचे होईपर्यंत आंशिक पैसे काढण्याची ही सुविधा फक्त 3 वेळा उपलब्ध असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2024 2:38 PM IST


