IND vs AUS : कॅप्टन सूर्या धक्का देणार, पहिल्या T20 मधून मॅच विनरलाच बाहेर करणार, अशी असणार Playing XI!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी-20 सीरिजला बुधवारपासून सुरूवात होत आहे. पहिला टी-20 सामना कॅनबेरामध्ये खेळला जाणार आहे.
कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी-20 सीरिजला बुधवारपासून सुरूवात होत आहे. पहिला टी-20 सामना कॅनबेरामध्ये खेळला जाणार आहे. कॅनबेरामध्ये, भारतीय बॉलरना एका महिन्यापूर्वी आशिया कप दरम्यान दुबईमध्ये ज्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागला होता, त्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि दुबईमधील खेळपट्ट्यांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. त्यामुळे, पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाची बॉलिंग कशी असेल? याबाबत चर्चा सुरू आहेत.
दुबईप्रमाणे टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये 4 स्पिनरना घेऊन खेळण्याचा विचार करणार नाही, पण स्पिनरची भूमिका महत्त्वाची असेल, असे संकेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दिले आहेत.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
'टीममध्ये फारसा बदल झालेला नाही. मागच्या वेळी आम्ही दक्षिण आफ्रिकेत गेलो होतो, तेव्हा एक फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर आणि तीन स्पिनर घेऊन खेळलो होतो. इथली परिस्थिती सारखीच आहे', असं सूर्यकुमार यादव म्हणाला. सूर्यकुमार यादवने दिलेल्या या संकेतांमुळे पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडिया अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासह मैदानात उतरू शकते. याशिवाय वॉशिंगटन सुंदरचा पर्यायही उपलब्ध आहे.
advertisement
मॅच विनरला स्थान नाही
वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराह टी-20 सीरिजसाठी कमबॅक करत आहे. बुमराहसोबत डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग बॉलिंगची सुरूवात करेल. तर ऑलराऊंडर शिवम दुबे तिसरा फास्ट बॉलर असेल. सिडनीमध्ये झालेल्या शेवटच्या वनडेमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या हर्षित राणाला त्यामुळे बाहेर बसावं लागू शकतं. बॅटिंगमध्ये मात्र फार बदल व्हायची शक्यता कमी आहे.
advertisement
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 11:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : कॅप्टन सूर्या धक्का देणार, पहिल्या T20 मधून मॅच विनरलाच बाहेर करणार, अशी असणार Playing XI!


