IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया T20 चा थरार, किती वाजता सुरू होणार पहिला सामना, Live कुठे पाहता येणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आता 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. याआधी 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला होता.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजनंतर आता 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. याआधी 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला होता, त्यामुळे या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार आहे. टी-20 वर्ल्ड कप आता तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने ही सीरिज महत्त्वाची मानली जात आहे.
मागच्या काही काळात भारतीय टीमने टी-20 फॉरमॅटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्येही भारताचा दणदणीत विजय झाला. आशिया कपमधल्या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता. आशिया कप हा युएईमधल्या संथ आणि स्पिन बॉलिंगला अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर झाला होता, पण आता ऑस्ट्रेलियामधील आव्हान वेगळं असेल.
advertisement
ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्या या फास्ट बॉलिंगला अनुकूल आहेत, तसंच या खेळपट्ट्यांवर बाऊन्सही मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे भारतीय टीमला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल करावे लागणार आहेत. स्पिन बॉलरऐवजी टीममध्ये फास्ट बॉलरची संख्या जास्त असेल. तसंच ऑस्ट्रेलियामधील ग्राऊंड ही मोठी असल्यामुळे बॅटरना फोर आणि सिक्ससोबतच धावूनही रन काढाव्या लागणार आहेत.
कधी सुरू होणार सामना?
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हलमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.45 वाजता सुरू होईल, तर मॅचचा टॉस 1.15 वाजता होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय टीम मैदानात उतरेल.
भारत-ऑस्ट्रेलिया T20 सीरिजचं वेळापत्रक
पहिली टी-20- 29 ऑक्टोबर, दुपारी 1.45 वाजता, कॅनबेरा
दुसरी टी-20- 31 ऑक्टोबर, दुपारी 1.45 वाजता, मेलबर्न
advertisement
तिसरी टी-20- 2 नोव्हेंबर, दुपारी 1.45 वाजता, होबार्ट
चौथी टी-20- 6 नोव्हेंबर, दुपारी 1.45 वाजता, गोल्ड कोस्ट
पाचवी टी-20- 8 नोव्हेंबर, दुपारी 1.45 वाजता, ब्रिस्बेन
टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 11:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया T20 चा थरार, किती वाजता सुरू होणार पहिला सामना, Live कुठे पाहता येणार?


