Indian Railway : मिडल बर्थ सीटचा नियम काय? ट्रेनने नेहमी प्रवास करतात पण अनेकांना 'हे' माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करतात पण त्यांना बरेचसे रेल्वेचे नियम माहित नसतात. अनेकांना तर हे देखील माहित नाही की ट्रेनच्या मिडल बर्थचा देखील वेगळा नियम आहे.
advertisement
मिडल बर्थवर झोपण्यासाठी वेळेचा ठरलेला नियम भारतीय रेल्वेच्या ‘Commercial Manual Volume I’ च्या कलम क्रमांक 652 नुसार, प्रवाशांना मिडल बर्थ वापरण्याची परवानगी फक्त रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच आहे. सकाळी 6 नंतर मिडल बर्थ वर दुमडून ठेवणं आवश्यक असतं, जेणेकरून खालील बर्थवरील प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळू शकेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एवढच नाही तर रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये गोंगाट टाळावा, दिवे बंद ठेवावेत आणि इतर प्रवाशांचा विचार करावा. भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट सर्व प्रवाशांना सुखद आणि आदरपूर्वक प्रवासाचा अनुभव देणे आहे. त्यामुळे पुढच्या वेळी ट्रेनमध्ये मिडल बर्थ मिळाल्यास, वेळेचा नियम पाळा आणि तुमचंही, इतरांचंही प्रवास सुखद ठेवा.


