Team India : 'आठव्या क्रमांकावर बॅटिंगला तयार...', मुंबईच्या ऑलराऊंडरचं चॅलेंज, गंभीरच्या फेवरेटची सुट्टी होणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडिया वनडे क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर बॉलिंग ऑलराऊंडर शोधत आहे. हर्षित राणा हा सध्या या स्थानावर खेळत आहे.
मुंबई : टीम इंडिया वनडे क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर बॉलिंग ऑलराऊंडर शोधत आहे. हर्षित राणा हा सध्या या स्थानावर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या चांगल्या कामगिरीमुळे हर्षितसाठी भविष्यातील संधी निर्माण झाल्या आहेत. पण आता टीम इंडियाच्या सीनियर ऑलराऊंडरने आठव्या क्रमांकावर दावा ठोकला आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूरने 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या आठव्या क्रमांकावर लक्ष केंद्रीत केलं आहे. शार्दुल ठाकूर 2023 मध्ये भारताकडून शेवटची वनडे मॅच खेळला होता, पण तरीही त्याने कमबॅकची आशा सोडलेली नाही.
2025-26 च्या रणजी ट्रॉफीमध्ये शार्दुल ठाकूर मुंबईचं नेतृत्व करत आहे. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यानंतर शार्दुलने टीम इंडियातल्या कमबॅकबद्दल सांगितलं. '2027 चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. तिथल्या खेळपट्ट्या फास्ट बॉलिंगला अनुकूल आहेत, त्यामुळे माझ्याकडे संधी आहे. कामगिरी करत राहणं आणि टीम इंडियात कमबॅक करणं, महत्त्वाचं आहे. चांगली कामगिरी केली, तर निवड होईल. वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होत आहे, त्यामुळे आठव्या क्रमांकावर बॉलिंग करणाऱ्या ऑलराऊंडरची गरज पडू शकते. मी त्या जागेसाठी प्रयत्न करत आहे', असं शार्दुल ठाकूर म्हणाला आहे.
advertisement
मी कमबॅकसाठी तयार
'मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे. जर मला उद्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सांगितलं, तर मी तयार असेन', अशी प्रतिक्रिया शार्दुलने दिली आहे.
टीम इंडियात किती ऑलराऊंडर?
भारताकडे सध्या हार्दिक पांड्या हा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहे. पण त्याचा दुखापतींचा इतिहास पाहता, टीम मॅनेजमेंट नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांचा पर्याय म्हणून विचार करत आहे. या दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या टीममध्येही निवडण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकूरने आतापर्यंत 47 वनडे मॅच खेळल्या असून यात त्याने 65 विकेट घेतल्या आहेत. तसंच एका अर्धशतकासह त्याने 329 रनही केल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 10:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 'आठव्या क्रमांकावर बॅटिंगला तयार...', मुंबईच्या ऑलराऊंडरचं चॅलेंज, गंभीरच्या फेवरेटची सुट्टी होणार!


