बॉलिवूडच्या हँडसम हंकचा इंडस्ट्रीला रामराम! सलमान खानच्या फिल्ममधून केलेलं डेब्यू; पण कारण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Celebrity : सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या अभिनेत्याने आता अभिनय जगताला रामराम ठोकला आहे. पण त्यामागचं कारण काय?
मुंबई : १९८८ साली प्रदर्शित झालेला आणि थिएटरमध्ये ५० आठवडे चाललेला 'तेजाब' हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील गोल्डन जुबली क्लासिक ठरला. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट आजही लोकांच्या लक्षात आहे. पण, या चित्रपटाला ३७ वर्षे उलटल्यानंतर आता अभिनेते आदित्य पंचोली यांनी एक गुपित उघड केले आहे, ज्यामुळे कपूर कुटुंबावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आदित्य पंचोली यांनी 'X' हँडलवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी थेट बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य पंचोली यांनी दावा केला आहे की, 'तेजाब' चित्रपटासाठी अनिल कपूर यांच्यापूर्वी त्यांची आणि माधुरी दीक्षितची निवड निश्चित झाली होती.
अनिल कपूर नाही, तर आदित्य पंचोली होते पहिली पसंती?
advertisement
आदित्य पंचोली यांनी लिहिले आहे, "१९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब'साठी मी माधुरी दीक्षितच्या विरुद्ध पहिली निवड होतो. दिग्दर्शक एन. चंद्रा आजही सक्रिय आहेत, ते याची पुष्टी करू शकतात."
यापुढे आदित्य पंचोली यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणाले, "दुर्दैवाने, एका अभिनेत्याने आपल्या मोठ्या भावामार्फत दिग्दर्शकावर प्रभाव टाकून माझी जागा घेण्यास भाग पाडले. बाकीचा इतिहास तुम्हाला माहीत आहेच." आदित्य पंचोली यांनी स्पष्टपणे नाव घेतले नसले तरी, त्यांचे हे विधान बोनी कपूर आणि त्यांचे भाऊ अनिल कपूर यांच्याबद्दलच आहे, हे स्पष्ट होते.
advertisement
दुसऱ्या बाजूला सूरज पंचोलीचा इंडस्ट्रीला रामराम
एका बाजूला आदित्य पंचोली यांनी हा मोठा दावा केला असताना, दुसरीकडे त्यांच्या मुलाच्या करिअरची बातमी समोर आली आहे. सलमान खानने 'हीरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च केलेल्या सूरज पंचोली याने आता अभिनय जगताला रामराम ठोकला आहे.
चित्रपट समीक्षक केआरके यांच्या ट्वीटनुसार, फ्लॉप करिअरमुळे सूरज पंचोलीने आता बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला असून, तो लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे.
advertisement
वडिलांनी इतक्या वर्षांनी जुने आरोप करून खळबळ माजवली असताना, मुलाने मात्र ग्लॅमरच्या दुनियेला रामराम केल्यामुळे पंचोली कुटुंब सध्या चर्चेत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 10:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडच्या हँडसम हंकचा इंडस्ट्रीला रामराम! सलमान खानच्या फिल्ममधून केलेलं डेब्यू; पण कारण काय?


