Weather Alert : पुढील 3 दिवस धोक्याचे, मोंथा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अस्मानी संकट, या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
29 ऑक्टोबर बुधवार रोजी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मोंथा चक्रीवादळामुळे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
29 ऑक्टोबर बुधवार रोजी मुंबईसह कोकण विभागातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवार आणि शुक्रवारी काहीसी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
महाराष्ट्रात बुधवारी आणि गुरुवारी काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. तर जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement


