advertisement

BMC Election : कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, बीएमसी निवडणुकीत ४३ जागांवर घराणेशाही, पाहा यादी

Last Updated:

BMC Election interested Candidates: कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचा दावा सगळ्याच राजकीय पक्षांनी केला. मात्र, दुसरीकडे आता अनेकांनी आपल्या घरातच उमेदवारी कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले आहे.

कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, नातीगोतीमुळे बीएमसी निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..पाहा यादी
कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, नातीगोतीमुळे बीएमसी निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..पाहा यादी
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून ‘कार्यकर्त्यांची निवडणूक’ लढवली जात असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र घराणेशाहीचं वर्चस्व पुन्हा एकदा उघडपणे समोर आलं आहे.
एका बाजूला घराणेशाहीला विरोध करणाऱ्या नेत्यांची भाषणं सुरू असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घरातील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे घराणेशाहीवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या एका आमदाराच्या घरातून तब्बल तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
फक्त भाजपच नव्हे, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह इतर पक्षांतही नातेवाईकांना उमेदवारी देण्याचा सिलसिला सुरूच आहे. उपलब्ध माहितीनुसार मुंबईतील तब्बल ४३ जागांवर विविध पक्षांच्या नेत्यांची मुलं, मुली, पत्नी, भाऊ किंवा इतर नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची नसून, ‘कुटुंबीयांची’ झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...

या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याने अंतर्गत असंतोष वाढण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत केवळ पक्षांची नव्हे, तर थेट नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नातेवाईक उमेदवारांच्या विजय-पराजयावर संबंधित नेत्यांचं राजकीय वजन ठरणार असल्याने, मुंबई महापालिका निवडणूक यावेळी अनेक अर्थांनी निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत.
advertisement

>> साटमांचा मेव्हाणा, घोसाळकरांचा लेक, दरेकरांचा भाऊ...बीएमसीच्या रिंगणातील नातीगोतींची यादी

नेत्याचे नावपक्षउमेदवारनाते
1विनोद घोसाळकरउद्धवसेनातेजस्वी घोसाळकरसून
2आ. प्रवीण दरेकरभाजपप्रकाश दरेकरभाऊ
3ज्ञानमूर्ती शर्माभाजपसंगीता शर्मापत्नी
4जया तियानाभाजपतेजिंदर सिंग तियानामुलगा
5समीर देसाईभाजपरंजून समीर देसाईपत्नी
6दिलीप पटेलभाजपसंदीप पटेलमुलगा
7डॉ. भारती लवेकरभाजपयोगीराज दाभाळकरभाचा
8रघुनाथ कुलकर्णीभाजपसायली कुलकर्णीमुलगी
9अमित साटमभाजपरोहन राठोडमेहुणा
10किरीट सोमैय्याभाजपनील सोमैय्यामुलगा
11सुरेखा लोखंडेभाजपरोहिदास लोखंडेपती
12राज पुरोहितभाजपआकाश पुरोहितमुलगा
13राहुल नार्वेकरभाजपहर्षिता नार्वेकरभावजय
14राहुल नार्वेकरभाजपमकरंद नार्वेकरभाऊ
15राहुल नार्वेकरभाजपगार्गी शिवलकरबहीण
16रवींद्र वायकरशिंदेसेनादीप्ती पोतनीस-चावरेकरमुलगी
17अशोक पाटीलशिंदेसेनारुपेश पाटीलमुलगा
18दिलीप लांडेशिंदेसेनाशैला लांडेपत्नी
19संजय तुर्डेशिंदेसेनामीनल तुर्डेपत्नी
20सदा सरवणकरशिंदेसेनाप्रिया सरवणकर नृत्यामुलगी
21सदा सरवणकरशिंदेसेनासमाधान सरवणकरमुलगा
22विनोद घोसाळकरउद्धवसेनासौरभ घोसाळकरमुलगा
23माधुरी भोईरउद्धवसेनायोगेश भोईरपती
24सुनील प्रभूउद्धवसेनाअंकिता प्रभूमुलगी
25हारून खानउद्धवसेनासबा खानमुलगी
26विश्वनाथ महाडेश्वरउद्धवसेनापूजा महाडेश्वरपत्नी
27विनायक राऊतउद्धवसेनायोगेश राऊतमुलगा
28श्रीकांत सरमळकरउद्धवसेनाहरी शास्त्रीजावई
29संजय दीना पाटीलउद्धवसेनाराजोल पाटीलमुलगी
30प्रकाश फातर्फेकरउद्धवसेनासुप्रदा फातर्फेकरमुलगी
31सुनील शिंदेउद्धवसेनानिशिकांत शिंदेभाऊ
32आशिष चेंबूरकरउद्धवसेनाप्रज्ञा चेंबूरकरपत्नी
33मनोज जामसुतकरउद्धवसेनासोनम जामसुतकरपत्नी
34अशोक धात्रकउद्धवसेनाअजिंक्य धात्रकमुलगा
35ॲड युसूफ अब्राहानीसपाअमरीन अब्राहानीजावई
36नवाब मलिकराष्ट्रवादी (अप)कप्तान मलिकभाऊ
37नवाब मलिकराष्ट्रवादी (अप)डॉ. सईदा खानबहीण
38कप्तान मलिकराष्ट्रवादी (अप)बुशरा मलिकसून
39अस्लम शेखकाँग्रेसकमर जहाँ सिद्दिकीबहीण
40अस्लम शेखकाँग्रेसहैदरअली शेखमुलगा
41मोहसीन हैदरकाँग्रेसमेहेर हैदरपत्नी
42चंद्रकांत हंडोरेकाँग्रेसप्रज्योती हंडोरेमुलगी
43दीपक काळेकाँग्रेसआशा काळेपत्नी
44विनोद घोसाळकरउद्धवसेनासौरभ घोसाळकरमुलगा
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, बीएमसी निवडणुकीत ४३ जागांवर घराणेशाही, पाहा यादी
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement