Samantha Prabhu Honeymoon: आधी गुपचूप लग्न, आता समांथाने हनीमूनसाठी निवडलं खास ठिकाण; राज निदिमोरूचा क्यूट लूक व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Samantha Prabhu Honeymoon Pics: कोणालाही कानोकान खबर लागू न देता समांथाने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली. आता हे न्यूली वेड कपल हनीमूनसाठी परदेशी गेले असल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबई: साऊथ क्वीन समांथा रुथ प्रभुने १ डिसेंबर रोजी जेव्हा आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले, तेव्हा सोशल मीडियावर जणू भूकंपच आला. कोणालाही कानोकान खबर लागू न देता समांथाने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली. आता हे न्यूली वेड कपल हनीमूनसाठी परदेशी गेले असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
समांथा आणि राज यांची केमिस्ट्री केवळ वैयक्तिक आयुष्यातच नाही, तर पडद्यावरही सुपरहिट ठरली आहे. 'द फॅमिली मॅन २' आणि 'सिटाडेल: हनी बनी' यांसारख्या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये राजने समांथाला डायरेक्ट केलं होतं. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ही मैत्री आता आयुष्यातील महत्त्वाची साथ बनली आहे. विशेष म्हणजे हे दोघांचंही दुसरं लग्न आहे.











