14,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा निर्णय ऐकून अंगावर काटा येईल; हजारो लोक रात्रभर झोपले नाहीत

Last Updated:

Lay Off: एआयच्या युगात अ‍ॅमेझॉननं जबरदस्त निर्णय घेत 14,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे IT क्षेत्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, भविष्यात आणखी मोठ्या कपातीची शक्यता वर्तवली जाते.

News18
News18
सिएटल: ई-कॉमर्स आणि क्लाऊड कम्प्युटिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) ने सुमारे 14,000 कॉर्पोरेट पदे कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठ्या कपातीपैकी एक मानली जात आहे. कंपनीने सांगितले की- हा निर्णय तिच्या संघटनेला अधिक कार्यक्षम, सुटसुटीत आणि एआय-केंद्रित (AI-focused) बनवण्यासाठी घेतला जात आहे.
advertisement
ही छाटणी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जस्सी (Andy Jassy) यांच्या बहुवर्षीय खर्च-कपात आणि पुनर्रचना मोहिमेचा भाग आहे. जस्सी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात खर्चकपातीसाठी अनेक पावले उचलली आहेत आणि या नव्या टप्प्यामुळे ती मोहिम अधिक गती घेणार आहे.
advertisement
कमी कर्मचाऱ्यांसह अधिक कार्यक्षमता
अ‍ॅमेझॉनने सांगितले की ही कपात कंपनीला अधिक leaner आणि कमी प्रशासकीय स्तर असलेली (less bureaucratic) बनवण्यासाठी केली जात आहे. कंपनीच्या मते ते आता आपल्या सर्वात मोठ्या पैजांमध्ये विशेषतः जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Generative AI) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे.
advertisement
या निर्णयामुळे कंपनीच्या सुमारे 3.5 लाख कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजी कर्मचाऱ्यांपैकी 4% कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. या पुनर्रचनेचा उद्देश व्यवस्थापन साधे करणे, निर्णयप्रक्रिया वेगवान करणे आणि तंत्रज्ञानाच्या नव्या युगाशी जुळवून घेणे हा आहे.
अ‍ॅमेझॉनच्यापीपल एक्सपिरियन्स अँड टेक्नॉलॉजी’ विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गॅलेटी (Beth Galetti) म्हणाल्या, ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पिढी इंटरनेटनंतरची सर्वात परिवर्तनकारी तंत्रज्ञानक्रांती आहे. आम्ही खात्रीने सांगू शकतो की- आता आम्हाला कमी स्तरांवर, अधिक स्वायत्ततेसह आणि अधिक गतीने काम करण्यासाठी संघटना नव्याने उभारावी लागेल.
advertisement
कर्मचाऱ्यांसाठी मदतीची हमी
गॅलेटी यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले की- ज्यांच्या पदांवर परिणाम होणार आहे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. बहुतेक कर्मचाऱ्यांना आम्ही 90 दिवसांचा कालावधी देत आहोत. ज्यामध्ये ते अ‍ॅमेझॉनमधील इतर विभागांत नवीन भूमिका शोधू शकतात.
advertisement
रिक्रूटमेंट टीम सर्वप्रथम आतल्या उमेदवारांना प्राधान्य देईल. जे कर्मचारी अ‍ॅमेझॉनमध्ये नव्या भूमिकांसाठी अर्ज करणार नाहीत किंवा पात्र ठरणार नाहीत, त्यांना सेव्हरन्स पे (severance pay), आउटप्लेसमेंट सर्व्हिसेस, हेल्थ इन्शुरन्स फायदे आणि इतर ट्रान्झिशन सपोर्ट सुविधा दिल्या जातील.
advertisement
महामारीनंतर अ‍ॅमेझॉनची पुनर्रचना
अ‍ॅमेझॉन सध्या जगभरात सुमारे 1.54 दशलक्ष (15 लाखांहून अधिक) कर्मचारी ठेवते. पण महामारीदरम्यान झालेल्या प्रचंड विस्तारानंतर कंपनीने 2022 ते 2023 या कालावधीतच सुमारे 27,000 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. ही 14,000 पदांची नवी कपात म्हणजे कंपनीच्या कार्यक्षमतेच्या पुढील टप्प्याचे चिन्ह मानले जात आहे.
एआयकडे झपाट्याने वाटचाल
CEO अँडी जस्सी यांनी स्पष्ट केले की, जनरेटिव्ह एआय (Generative AI) ही तंत्रज्ञानक्रांती कंपनीच्या प्रत्येक स्तरावर कायमस्वरूपी बदल घडवणार आहे. आम्हाला काही क्षेत्रांत कमी लोकांची गरज राहील, पण नवीन प्रकारच्या कामांसाठी अधिक लोकांची आवश्यकता भासेल. याचा अर्थ असा की ‍ॅमेझॉन काही पारंपरिक पदे कमी करणार असली तरी; त्याच वेळी AI आणि क्लाऊड कम्प्युटिंग क्षेत्रात नव्या नोकऱ्या निर्माण करेल.
उद्योगातील व्यापक ट्रेंड
‍ॅमेझॉनचा हा निर्णय जागतिक स्तरावर उद्योगक्षेत्रात चालू असलेल्या एका मोठ्या बदलाचा भाग आहे. जिथे अनेक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपले कामकाज स्वयंचलित (automate) करत आहेत आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीने स्पष्ट केले की- AI आणि क्लाऊड हे तिचे "स्ट्रॅटेजिक प्राधान्य क्षेत्र" असतील आणि या विभागांत भरती सुरूच राहील, जरी इतर ठिकाणी पदे कमी केली जात असली तरी.
view comments
मराठी बातम्या/मनी/
14,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, जगातील सर्वात मोठ्या कंपनीचा निर्णय ऐकून अंगावर काटा येईल; हजारो लोक रात्रभर झोपले नाहीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement