Amazon Sale : स्वयंपाकघरापासून बेडरुमपर्यंत... घरासाठी लागणाऱ्या वस्तू अवघ्या 99 रुपयांपासून! Amazon वर सुरू झालाय धमाका सेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सध्या Amazon India वर एक खास सेल सुरू झाला असून, यामध्ये घरगुती वापराच्या इलेक्ट्रिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. अवघ्या 99 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : महागाईच्या काळात घरखर्च सांभाळताना आपली सर्वांचीच तारांबळ उडते. कधी स्वयंपाकघरातील चॉपर खराब होतो, तर कधी मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकेट अपुरे पडतात. या छोट्या-छोट्या गोष्टींवर खर्च करताना खिशाला कात्री लागते. पण, जर तुम्हाला कळलं की तुमच्या घरासाठी लागणाऱ्या या अत्यावश्यक वस्तू चक्क 100 रुपयांच्या आत मिळू शकतात, तर?
हो, हे खरं आहे, सध्या Amazon India वर एक खास सेल सुरू झाला असून, यामध्ये घरगुती वापराच्या इलेक्ट्रिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. अवघ्या 99 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अवघ्या ९९ रुपयांत १० LED बल्ब
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ॲमेझॉनवर USB LED Bulb चे 10 नग अवघ्या 99 रुपयांत मिळत आहेत. हे 1 वॉट (1W) क्षमतेचे बल्ब असून तुम्ही ते तुमच्या मोबाईल चार्जरच्या ॲडॉप्टरला जोडून किंवा लॅपटॉपला जोडून नाईट लॅम्पसारखे वापरू शकता. प्रवासात किंवा अभ्यासासाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत.
advertisement
मल्टीपर्पज एक्सटेंशन बोर्ड
घरात एकाच वेळी अनेक उपकरणे लावायची असतील तर एक्सटेंशन बोर्ड हवाच. Amazon वर GM 3060 हा 10 अँपिअर आउटपुट असलेला एक्सटेंशन बोर्ड फक्त 399 रुपयांत उपलब्ध आहे. याला 2 मीटरची वायर आहे आणि तो दीर्घकाळ टिकणारा आहे.
किचनची कामं होतील सोपी
कांदा कापण्याचा किंवा भाज्या चिरण्याचा कंटाळा येतो? मग AGARO Elite चा रिचार्जेबल मिनी इलेक्ट्रिक चॉपर तुमच्यासाठी बेस्ट आहे. 250 मिली क्षमतेचा हा चॉपर सेलमध्ये फक्त 599 रुपयांत मिळत आहे. विशेष म्हणजे हा रिचार्जेबल असल्याने वायरचं टेन्शनही नाही.
advertisement
हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी 'एअर फ्रायर'
विना तेल किंवा कमी तेलात पदार्थ तळायचे असतील तर एअर फ्रायरला पर्याय नाही. Kent सारख्या नामांकित ब्रँड्सचे एअर फ्रायर आता फक्त 2,799 रुपयांपासून उपलब्ध आहेत. समोसे असोत की फ्रेंच फ्राईज, आता डाएटिंगची काळजी न करता तुम्ही खाऊ शकता.
घराच्या सुरक्षिततेसाठी 360° कॅमेरा
घराबाहेर असताना घराची चिंता वाटते? Imou 360° CCTV कॅमेरा 1,999 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग, नाईट व्हिजन आणि टू-वे ऑडिओ सपोर्ट ही याची वैशिष्ट्ये आहेत.
advertisement
वॉटर डिस्पेंसर आणि रिचार्जेबल टॉर्च
Konquer TimeS ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेंसर: 20 लीटरच्या पाण्याच्या बॉटलवर फिट होणारा हा पंप फक्त 315 रुपयांत मिळतोय. 1200 mAh बॅटरीमुळे तो एकदा चार्ज केला की बराच काळ चालतो.
Portronics टॉर्च: पोर्ट्रॉनिक्सची रिचार्जेबल टॉर्च 399 रुपयांत मिळत आहे, ज्यामध्ये टेलिस्कोपिक झूम आणि उत्तम बॅटरी लाईफ देण्यात आली आहे.
advertisement
घर सजवण्यासाठी किंवा दैनंदिन कामे सोपी करण्यासाठी हे गॅजेट्स अत्यंत उपयुक्त आहेत. 99 रुपयांपासून सुरू होणारी ही डील मर्यादित काळासाठी असू शकते, त्यामुळे स्टॉक संपण्यापूर्वी तुमची आवडती वस्तू ऑर्डर करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Amazon Sale : स्वयंपाकघरापासून बेडरुमपर्यंत... घरासाठी लागणाऱ्या वस्तू अवघ्या 99 रुपयांपासून! Amazon वर सुरू झालाय धमाका सेल










