BJP : गुलाल उधळला! भाजपची जोरदार मुसंडी, 6-0 ने विजयी आघाडी; नगरसेवक असे जिंकले!

Last Updated:

महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपने निकाल लागण्याआधीच विजयी षटकार लगावला आहे. 

News18
News18
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी महायुती आणि विरोधक पूर्ण ताकदीने एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी  विरुद्ध ठाकरे बंधू शरद पवार गट, काँग्रेस वंचित आघाडी असा सामना रंगला आहे. काही ठिकाणी महायुतीतच शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. पण अशातच महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपने निकाल लागण्याआधीच विजयी षटकार लगावला आहे.
महाराष्ट्रामध्ये २९ महापालिकांसाठी सगळ्याच पक्षाचे उमेदवार आता रिंगणात आले आहे. कारण, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता उमेदवारी अर्ज कोण मागे घेणार हे दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण, निवडणुकीचे अर्ज दाखल होताच काही ठिकाणी बिनविरोध निकाल लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपने विजयाचं खातं उघडत हॅट्रटिक साधली आहे.
KDMC मध्ये भाजपची विजयी हॅट्रटिक
advertisement
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच रेखा राम यादव -चौधरी या  प्रप्रभाग क्र. १८ (अ) मधून बिनविरोध  विजयी झाल्या आहेत. त्यापाठोपाठ  आसावरी केदार नवरे यांची डोंबिवलीतील प्रभाग क्र. २६ (क) मधून बिनविरोध निवड झाली आहे. तर  रंजना मितेश पेणकर यांचा  प्रभाग क्र. २६ (ब) मधून विजय झाला आहे. या ठिकाणी विरोधात उमेदवार नसल्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने याठिकाणी उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे भाजपचा केडीएमसीमध्ये मतदानाआधीच उमेदवाराचा विजय झाला आहे.
advertisement
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे २ उमेदवार बिनविरोध विजयी
तर धुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने खातं उघडलं आहे.  महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 अ च्या भाजपाच्या उमेदवार उज्वला भोसले बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रति स्पर्धी समोरच्या उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत  बाद झाला आहे. प्रभाग क्रमांक 1 अ मधून एकमेव भाजपच्या उज्ज्वला रणजितराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवार उज्वला रणजीत राजे भोसले यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या त्या पत्नी आहे.  दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपात प्रवेश केला होता. या विजयानंतर  भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.
advertisement
तर  धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल पाटील बिनविरोध निवड झाली आहे. विरोधात उमेदवारी अर्ज नसल्याने ज्योत्स्ना पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.  शिवसेना ठाकरे गटातून  ज्योत्स्ना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
advertisement
पनवेलमध्ये १ उमेदवार बिनविरोध विजयी
तर पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.  शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील बिनविरोध निवडून आले आहे.  शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने नितीन पाटील विजयी झाले आहेत. नितीन पाटील हे पालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. पनवेलमध्ये भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करीत महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक फोडल्याने महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. पनवेल शहर ,नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपला शहरात निवडणूक सोपी जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
BJP : गुलाल उधळला! भाजपची जोरदार मुसंडी, 6-0 ने विजयी आघाडी; नगरसेवक असे जिंकले!
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement