advertisement

Pune Metro: पुणेकरांनो वाहतूक कोंडी विसरा! शहराचा कायापालट होणार; मेट्रोचं 200 किमीचं जाळं विस्तारणार, असा आहे प्लॅन

Last Updated:

मुख्यमंत्री म्हणाले की, पुणे हे देशातील सर्वाधिक गतिमान मेट्रो प्रकल्पांपैकी एक आहे. भविष्यात हे जाळे २०० किमीपर्यंत विस्तारले जाईल

मेट्रोचं 200 किमीचं जाळ विस्तारणार (फाईल फोटो)
मेट्रोचं 200 किमीचं जाळ विस्तारणार (फाईल फोटो)
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची नवी ओळख आता 'सायकलचे शहर' कडून 'मेट्रो सिटी' अशी वेगाने होताना दिसत आहे. शहराचा वाढता विस्तार आणि वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता, पुणे मेट्रोचा विस्तार आगामी काळात २०० किलोमीटरपर्यंत नेण्याचा मेगा प्लॅन राज्य सरकारने तयार केला आहे. रविवारी शिवाजीनगर येथील 'मेट्रो भवन'च्या दिमाखदार उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली.
२०० किलोमीटरचे जाळे
सध्या पुण्यात ३३ किलोमीटरवर मेट्रो धावत असून तिला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "पुणे हे देशातील सर्वाधिक गतिमान मेट्रो प्रकल्पांपैकी एक आहे. भविष्यात हे जाळे २०० किमीपर्यंत विस्तारले जाईल, ज्यापैकी ८० किलोमीटरचे मार्ग आधीच प्रस्तावित आहेत." केवळ मेट्रोच नाही, तर रस्ते, उड्डाणपूल आणि बोगद्यांच्या कामांसाठी सुमारे ३० ते ३५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून, पुणे लवकरच वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
पुणे बनणार 'जीसीसी' हब
पुणे हे केवळ पायाभूत सुविधांमध्येच नाही तर रोजगारातही आघाडीवर राहणार आहे. देशात सध्या असलेल्या 'ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर' (GCC) च्या लाटेत पुणे हे मुख्य हब बनत आहे. यामुळे पुण्यातील तरुणांना उच्च दर्जाच्या नोकऱ्या आणि चांगला पगार मिळेल, ज्यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 'मेट्रो भवन'ला आधुनिक पुण्याचे प्रतीक म्हटले. तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कार्यक्षमता यांचा संगम असलेल्या या इमारतीमुळे मेट्रो प्रशासनाला अधिक सक्षमपणे काम करता येईल. या कार्यक्रमाला शहरातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुणेकरांनो वाहतूक कोंडी विसरा! शहराचा कायापालट होणार; मेट्रोचं 200 किमीचं जाळं विस्तारणार, असा आहे प्लॅन
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement