advertisement

Iran War: ध्वनीपेक्षा १३ पट वेग, अवाढव्य पल्ला! इराणने आजवर न वापरलेलं क्षेपणास्त्र इस्रायलवर डागलं, आखातात युद्धाचा भडका!

Last Updated:

Iran Israel Conflict: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने आज १७ व्या दिवशी अत्यंत भीषण वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेल्या या युद्धाची दाहकता वाढत चालली आहे.

News18
News18
तेहरान/तेल अवीव: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने आज १७ व्या दिवशी अत्यंत भीषण वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेल्या या युद्धाची दाहकता वाढत चालली आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्रायला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू आहेत. तर, इस्रायललाही क्षेपणास्त्र हल्ले करुन हतबल केले आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे.
इराणने प्रथमच आपल्या भात्यातील सर्वात घातक शस्त्र असलेल्या 'सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा' (Sejjil Ballistic Missile) वापर करून इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता अधिक भडकण्याची चिन्हे आहेत.

काय आहे हे 'सेजिल' क्षेपणास्त्र?

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र घन इंधनावर चालणारे असून त्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा १३ पटीने जास्त (मॅक १३) आहे. २००० ते २५०० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र इस्रायलसह भारत, युक्रेन आणि रशियाच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकते. कुराणातील 'जळणारा दगड' या संदर्भावरून याला 'सेजिल' असे नाव देण्यात आले आहे.
advertisement
इराणने आपल्याकडील अनेक क्षेपणास्त्रे, सुरक्षित असून त्यांना टप्प्याटप्प्याने युद्धात वापरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याशिवाय, मागील काही दिवसात आणखी काही क्षेपणास्त्रे विकसित केली असून त्याचा वापरही होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

इराणची आक्रमक भूमिका, चर्चेला पूर्णविराम

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने ना युद्धविरामाची मागणी केली आहे, ना अमेरिकेशी चर्चेचा कोणताही प्रयत्न केला आहे. "जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत इराण स्वतःचे संरक्षण करेल. जोपर्यंत ट्रम्प हे युद्ध बेकायदेशीर असल्याचे मान्य करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही," असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
advertisement

होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद नाही पण इराणचं 'स्मार्ट कंट्रोल'

जगातील तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' पूर्णपणे बंद केली नसल्याचे इराणने म्हटले आहे. मात्र, तिथे 'स्मार्ट कंट्रोल' लागू करण्यात आले आहे. याचा अर्थ हा जलमार्ग केवळ अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी बंद असेल, तर इतर देशांसाठी तो सुरू राहील, असा दावा इराणने केला आहे. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: ध्वनीपेक्षा १३ पट वेग, अवाढव्य पल्ला! इराणने आजवर न वापरलेलं क्षेपणास्त्र इस्रायलवर डागलं, आखातात युद्धाचा भडका!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement