advertisement

Instagramची प्रायव्हसी संपली! मेटाची मोठी घोषणा, महत्त्वाचं फीचर बंद

Last Updated:
Instagram च्या कोट्यवधी यूझर्ससाठी वाईट बातमी आहे. कंपनीने डायरेक्ट मेसेजवरुन एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हटवण्याची घोषणा केली आहे. याचा यूझर्सवर काय परिणाम होईल पाहूया...
1/9
मुंबई : इंस्टाग्रामचे मेसेज आता प्रायव्हेट राहणार नाही. लोकप्रिय अॅप इंस्टाग्रामने एंट-टू-एंड एन्क्रिप्शन मेसेज फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाने घोषणा केली आहे की, हे फीचर येत्या 8 मे 2026 नंतर इंस्टाग्रामवरुन हटवलं जाईल. यानंतर तुमच्या इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज म्हणजेच डीएम्स प्रायव्हेट राहणार नाही. याचा अर्थ मेसेजवरुन एंड-टू-एंड एन्क्रिप्शन संपवलं जाईल. मेटाने आपल्या सपोर्ट पेज अपडेटमध्ये सांगितले की, हे फीचर खुप कमी यूझर्स वापरत होते. त्यामुळे हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2/9
हे फीचर इंस्टाग्राममध्ये कसं काम करत होते हे जाणून घेऊया. व्हॉट्सअॅप प्रमाणे इंस्टाग्रामवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन डिफॉल्टरित्या चालू नव्हता. हा फक्त काही भागांमध्ये उपलब्ध होता. यूझर्सला हे फीचर प्रत्येक चॅटमध्ये मॅन्युअली ऑन करावे लागत होते.

3/9
मेटाचे प्रवक्ता म्हणाले की, खुप कमी लोक या फीचरचा वापर करत होते. यामुळे कंपनी हे हटवण्याचा निर्णय घेत आहे. कंपनीचे प्रवक्ता म्हणाले की, की 'खुप कमी लोक इंस्टाग्राम DMs मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा वापर करत होते. यामुळे येत्या महिन्यात हे ऑप्शन हटवले जाईल. एखादा यूझर एन्क्रिप्टेड मेसेजिंग जारी ठेवू इच्छित असेल तर ते व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतात.'

4/9
मेसेंजरवर काय होईल? मेसेंजरमध्ये काही बदल केला जाईल की नाही यावर मेटाने अद्याप काहीच क्लियर केलेले नाही. कंपनीने 2023 मध्ये मेसेंजवर डिफॉल्ट एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लागू करण्यास सुरुवात केली होती आणि अजुनही हे फीचर आणखी सुरक्षित बनवण्याची प्रोसेस जारी आहे.

5/9
मेटाच्या एन्क्रिप्शन पॉलिसी : मेटाने सर्वात पहिले 2016 मध्ये व्हॉट्सअॅपवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लागू केला होता. नंतर 2029 मध्ये कंपनीचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी घोषणा केली होती की, कंपनी आपल्या सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर प्रायव्हसी-फोकस्ड स्ट्रॅटेजी अवलंबणार आहे.

6/9
खरंतर ही योजना लागू करण्यात वेळ लागला. 2021 मध्ये मेटाचे सेफ्टी हेड यांनी म्हटले होते की, कंपनी एन्क्रिप्शन रोलआउट ला 2023 पर्यंत टाळत आहे. जेणेकरून सुरक्षेसंबंधीत चांगले उपाय तयार करता येतील.

7/9
Encryption वर वाद का? एंड-टू-एंड एन्क्रिप्शन दीर्घकाळापासून वादाचा विषय ठरला आहे. अनेक सरकारी आणि चाइल्ड सेफ्टी संघटना मानतात की, ही टेक्नॉलॉजी ऑनलाइन स्कॅमर्स आणि लहान मुलांना निशाणा बनवणाऱ्यांना लोकांना पकडणे अवघड करु शकते.

8/9
अमेरिकेच्या New Mexico मध्ये चालू असलेल्या एका चाइल्ड सेफ्टी ट्रायल दरम्यान मेटाचे इंटरनल डॉक्यूमेंटमध्येही न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या डॉक्यूमेंटमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये यूझर प्रायव्हसी आणि ऑनलाइन सुरक्षिततेमधील संतुलनावर कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेख आहे.

9/9
ट्रायलमध्ये दिेलेल्या जबाबात मार्क जुकरबर्ग यांनी म्हटले की, सुरक्षा चिंतांमुळे मेसेंजरवर एन्क्रिप्शन लागू करण्यास वेळ लागला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, मजबूत एन्क्रिप्शन सामान्य यूझर्स आणि सुरक्षा विशेषज्ञ दोन्हींसाठी सकारात्मक मानले जात आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement