advertisement

पुणे हादरलं! 300 कोटींची जमीन अन् 37 कोटींची फसवणूक; मोठ्या राजकीय नेत्याचं नाव समोर आल्यानं खळबळ

Last Updated:

सुमारे ३०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या जमिनीच्या विकास करारात तब्बल ३७ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

३७ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
३७ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातील महंमदवाडी परिसरात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात सुमारे ३०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या जमिनीच्या विकास करारात तब्बल ३७ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे आणि सिद्धांत भानगिरे यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक विश्वजित सुभाष झंबर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 2011 ते 2026 या प्रदीर्घ काळात हा फसवणुकीचा कट रचला गेला.
आरोपींनी फिर्यादींना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून महंमदवाडीतील 20 एकर जमिनीच्या विकसन करारासाठी 22 कोटी रुपये घेतले आणि त्यानंतर प्रकल्पासाठी अधिकचे १५ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडले. धक्कादायक बाब म्हणजे, जमिनीचे टायटल क्लिअर न करताच फिर्यादींच्या संमतीशिवाय सर्व्हे नंबर १८ मधील १२ गुंठे जमीन परस्पर नाना भानगिरे आणि इतरांना विकण्यात आली. हा व्यवहार कायदेशीर दाखवण्यासाठी बनावट यूएलसी (ULC) आदेशाचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement
या प्रकरणात गोयल, पटेल आणि ठकवाणी डेव्हलपर्सच्या भागीदारांचाही समावेश असून आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, वल्लभ लालजी पटेल यांच्यासह सात जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे, मात्र गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांनी या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! 300 कोटींची जमीन अन् 37 कोटींची फसवणूक; मोठ्या राजकीय नेत्याचं नाव समोर आल्यानं खळबळ
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement