advertisement

Kalyan : भाई तुरुंगात पण पंटरने केलं कांड, भाईच्या बर्थडेसाठी पोलिसांसमोरच जेलबाहेर फोडले फटाके; पाहा VIDEO

Last Updated:

Kalyan Shocking Video : कल्याणमधील आधारवाडी कारागृहासमोर अतिशय संतापजनक पण तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडे कारवाईची मागणी केलेली आहे.

कल्याणमधील आधारवाडी जेलबाहेर भाईच्या गँगने फटाके उडवत जल्लोष केल्याचे दिसत आहे.
कल्याणमधील आधारवाडी जेलबाहेर भाईच्या गँगने फटाके उडवत जल्लोष केल्याचे दिसत आहे.
कल्याण : कल्याणमध्ये गुन्हेगारी घटना वाढत असताना आताच आधारवाडी कारागृहासमोरुन अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. घडलेल्या या घटनेमुळे जेलच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्चचिन्ह निर्माण झालेले असून सध्या सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल होत आहे.
जेलच्या मुख्य प्रवेशद्वारावरच थरार
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर काही तासांपासून कल्याणमधील आधारवाडी कारागृहसमोरील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती जेलच्या मुख्य गेटसमोर येतो आणि काही वेळात तो फटाक्यांची आतिषबाजी करतो. त्यानंतर तो मस्ती करताना रोडच्या दिशेने धावत जातो. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडल्याचं सांगितलं जात असून आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
नेमका तो व्यक्ती होता तरी कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, आधारवाडी कारागृहासमोर फटाक्यांची आतिषबाजी करणारा तो तरुण एका कुख्यात गुंड याचा समर्थक असल्याचे समजते. जो सतीश कांबळे उर्फ सत्या भाई नावाचा आरोपी काही काळापासून जेलमध्ये आहे आणि त्या दिवशी त्या आरोपीचा वाढदिवस होता,त्यामुळे ही आतिषबाजी केल्याचे समजते. याआधीही आधारवाडी कारागृहात जेलमधून बाहेर आल्यानंतर गुंड आणि भाई लोकांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आलेले आहे.
advertisement












View this post on Instagra


advertisement
advertisement
या प्रकारावर पोलिसांची कारवाई होणार का?
आधारवाडी कारागृहात होत असलेल्या अशा प्रकारावर खडकपाडा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत शिवाय यावर पोलिसांनी कारवाई केली आहे मात्र या घटना काही कमी होताना दिसत नाही. पण सध्या नुकताच समोर आलेल्या या व्हिडिओमधील समर्थकावरही ठोस कारवाई झाली होती अशी मागणी होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : भाई तुरुंगात पण पंटरने केलं कांड, भाईच्या बर्थडेसाठी पोलिसांसमोरच जेलबाहेर फोडले फटाके; पाहा VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement