advertisement

Dombivli Traffic : डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! काँक्रीटीकरणासाठी शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

Dombivli Traffic Update: डोंबिवली शहरात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही महत्त्वाचे रस्ते तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत.

काँक्रीटीकरणाच्या कामामुळे डोंबिवली शहरातील काही रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
काँक्रीटीकरणाच्या कामामुळे डोंबिवली शहरातील काही रस्ते बंद राहणार असून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
डोंबिवली : डोंबिवली शहातील नागरिकांना आजपासून बाहेर पडणे मनस्तापाचे होणार आहे. आजपासून या शहरातील काही रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार असून काही मार्ग वळवण्यात आलेले आहेत. या निर्बंधाचे नेमके कारण काय आणि कधीपर्यंत नागरिकांना त्रास जाणवणार आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट जाणून घ्या.
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी
डोंबिवली शहरात बहुतेक ठिकाणी विकासकामे सुरु आहेत, त्यातील एक भाग म्हणजे रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामामुळे पूर्व भागातील रस्ते बंद राहणार आहेत. या कामामुळे लोकमान्य टिळक रोड आणि न्यू आयरे रोड हे रस्ते बंद राहणार आहेत.
वापरा 'हे' पर्यायी मार्ग 
डोंबिवली शहरातील काही नागरिकांचा हा मार्ग दररोजच्या ये-जाण्याचा आहे तर त्यांनी वाहने सावरक रोड , गणेश मंदिर रोड तसेच वि.प मार्ग किंवा डॉ, राजेंद्र प्रसाद रोडने पुढे मानपाडा रोड फतेह अली/आगरकर रोड या सांगितलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
advertisement
कुठे असणार प्रवेश बंदी?
शहरातील भगतसिंग रोडवरून पिंगळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मदन ठाकरे चौक-फडके रोडच्या दिशेने जाण्यासाठी ताई पिंगळे चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. एवढेच नाही तर लोकमान्य टिळक रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना 24 तास नो पार्किंगही असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli Traffic : डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! काँक्रीटीकरणासाठी शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement