Gold And Silver: सोने कोसळले, चांदीची धुळधाण, बाजारात खळबळ; आता खरेदी करावी की थांबावं? 11 Expertनी दिला मोलाचा सल्ला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Price: अमेरिका-चीन व्यापार करारावर सकारात्मक संकेत मिळताच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीपासून माघार घेतली आणि सोन्याच्या किंमतींनी तीन आठवड्यांचा नीचांक गाठला. फेडरल रिझर्व्हच्या आगामी निर्णयांवर आता सोन्या-चांदीच्या दरांची दिशा अवलंबून राहणार आहे.
मुंबई: मंगळवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली असून, सोनं तीन आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचलं आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करारावर सकारात्मक संकेत मिळाल्याने गुंतवणूकदारांनी ‘सेफ-हेवन’ म्हणून सोन्याकडे केलेली गुंतवणूक थांबवली, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाला.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 3,941.65 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आली, तर अमेरिकन गोल्ड फ्युचर्स 3,957.50 डॉलर प्रति औंसवर स्थिरावले. सध्या सर्वांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक (ECB) आणि बँक ऑफ जपान यांच्या आर्थिक धोरणांकडे लागले आहे, ज्यावर पुढील काही महिन्यांत सोन्याची दिशा ठरेल.
advertisement
भारताच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोन्याच्या दरात जोरदार घसरण नोंदली गेली आहे. डिसेंबर वायदा सोनं तब्बल 3,300 प्रति 10 ग्रॅमने खाली येऊन व्यापार करत आहे. केवळ सोनंच नाही, तर चांदीच्याही भावात मोठी पडझड झाली आहे. डिसेंबर वायदा चांदी 3,900 प्रति किलोने घसरली असून, यामागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकन डॉलरने दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. डॉलर मजबूत झाल्याने मौल्यवान धातूंवरील गुंतवणुकीचा आकर्षण कमी झालं आहे. गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी नफा बुकिंग करत असल्याने प्रेशस मेटल्सवर विक्रीचा दबाव कायम आहे.
advertisement
अमेरिका-चीन व्यापार तणावात सध्या काही प्रमाणात कमी आल्याने गुंतवणूकदार सोन्याकडून दूर जात आहेत. KCM Trade चे चीफ अनॅलिस्ट टिम वॉटरर यांच्या मते, जर ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची बैठक सकारात्मक झाली, तर सोन्यावर आणखी दबाव येईल. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार फ्रेमवर्कबाबत करार होण्याची शक्यता असून, अमेरिकेने मलेशिया आणि इतर आशियाई देशांसोबत व्यापार आणि खनिज करार केले आहेत. या सकारात्मक बातम्यांमुळे ग्लोबल मार्केटमध्ये ‘risk-on mood’ म्हणजेच जोखीम घेण्याची भावना वाढली आहे.
advertisement
फेडरल रिझर्व्हकडून या आठवड्यात व्याजदर कपातीची अपेक्षा आहे. जर फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांनी डोविश म्हणजे सौम्य विधान केलं, तर सोन्याला अल्पकालीन आधार मिळू शकतो. दरम्यान ECB आणि बँक ऑफ जपानकडूनही व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता आहे. सध्याच्या वर्षात सोन्याने एकूण 51 टक्के वाढ दर्शवली असली, तरी ऑक्टोबरमधील उच्चांकापासून आता ते सुमारे 10 टक्क्यांनी खाली आलं आहे. 20 ऑक्टोबर रोजी सोनं 4,381.21 डॉलर प्रति औंस या ऑल-टाइम हायवर होतं. मात्र अलीकडील घसरण हे स्पष्ट दाखवत आहे की, सेफ-हेवन म्हणून सोन्याकडे असलेली गुंतवणूक सध्या थंडावली आहे.
advertisement
| बँक / संस्था | २०२५ चा अंदाज (USD/oz) | २०२६ चा अंदाज (USD/oz) | अहवालात काय म्हटलं आहे |
|---|---|---|---|
| Citi Bank | 3,400 | 3,250 | अल्पकालीन लक्ष्य (Short Term Target) घटवून $3,800 प्रति औंस केले आहे. |
| JP Morgan | 3,468 | 4,753 | २०२६ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत (Q4 2026) सोनं $5,055 पर्यंत जाण्याची अपेक्षा. |
| HSBC Bank | 3,455 | 4,600 | — |
| ANZ Bank | 3,494 | 4,445 | जून २०२६ पर्यंत सोनं $4,600 पर्यंत पोहोचू शकतं. |
| Bank of America | 3,352 | 4,438 | सोनं $5,000 पर्यंत वाढण्याची शक्यता. |
| Societe Generale | — | 5,000 | २०२६ च्या अखेरीस सोन्याची किंमत $5,000 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. |
| Standard Chartered | — | 4,488 | मध्यम कालावधीत (Mid-term) सोन्याच्या दरात हळूहळू वाढ अपेक्षित. |
| Goldman Sachs | 3,400 | 4,525 | डिसेंबर २०२६ पर्यंत सोनं $4,900 प्रति औंसपर्यंत जाऊ शकतं. |
| Commerzbank | 4,000 | — | २०२५ अखेरीस सोनं $4,200 प्रति औंसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज. |
| Deutsche Bank | 3,291 | 4,000 | सोनं $4,300 पर्यंत वाढू शकतं, असा अंदाज. |
| UBS Bank | — | 4,700 | ‘रिअल इंटरेस्ट रेट्स’मुळे सोन्याच्या किंमतीला आधार मिळेल. |
advertisement
सिटी बँकने आपल्या अल्पकालीन अंदाजात बदल करत तीन महिन्यांचा गोल्ड टार्गेट 3,800 डॉलर प्रति औंस ठरवला आहे. बँकेचं म्हणणं आहे की अमेरिका-चीन तणावात घट, महागाईच्या अपेक्षांमध्ये नरमी आणि अमेरिकन सरकारच्या शटडाऊन संकटाच्या सुटकेमुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा अंदाज आहे की 2025 मध्ये सोन्याच्या किंमती स्थिर राहतील आणि 2026 मध्ये त्या पुन्हा वाढून 4,400 ते 5,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात.
सध्या सोन्याची दिशा फेडरल रिझर्व्हच्या धोरणावर आणि अमेरिका-चीन चर्चेच्या निकालावर अवलंबून आहे. अल्पकालीन काळात सोन्यावर दबाव राहू शकतो, पण दीर्घकालीन दृष्टीने ते अजूनही महागाई आणि भू-राजकीय जोखमींविरुद्ध एक सुरक्षित गुंतवणूक (hedge) म्हणून टिकून राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 11:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold And Silver: सोने कोसळले, चांदीची धुळधाण, बाजारात खळबळ; आता खरेदी करावी की थांबावं? 11 Expertनी दिला मोलाचा सल्ला


