Shani Shukra Yuti 2026: शुक्र-शनिचा शुभ योग जुळला! नवीन वर्षात मिथुनसहित या 5 राशींना चांगले दिवस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Shukra Yuti 2026: वर्ष 2026 हे ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं मानलं जात आहे. नवीन वर्षात 15 जानेवारी रोजी शुक्र आणि शनि हे दोन ग्रह लाभ दृष्टी राजयोग तयार करत आहेत. वैदिक ज्योतिषानुसार शुक्र हा सुख, सुविधा, प्रेम, ऐश्वर्य आणि कलेचा कारक मानला जातो, तर शनि हा कर्म, न्याय आणि संघर्षाचं फळ देणारा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि शनि हे मित्र ग्रह मानले जातात. 15 जानेवारीला हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 90 अंश अंतरावर असतील, त्यामुळे हा शुभ राजयोग तयार होतो. या राजयोगाचा फायदा विशेषतः पाच राशींना जास्त प्रमाणात मिळणार आहे.
2026 मध्ये या राजयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी कमाईचे नवे मार्ग सापडतील. पैशांअभावी अडलेली कामं पुन्हा वेगाने पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचं कौतुक होईल, ज्यामुळे पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शुक्र तुम्हाला सुख-सुविधा देईल, तर शनि तुमच्या मेहनतीचं योग्य फळ देईल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला असून परीक्षांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत.
advertisement
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग परदेशाशी संबंधित संधी घेऊन येऊ शकतो. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांच्या अडचणी दूर होतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, आईसोबतचं नातं अधिक घट्ट होईल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्यात सुख-सुविधा वाढतील आणि कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीत असलेल्यांचा ताण कमी होईल, जबाबदाऱ्यांसोबत पगार वाढण्याचे योग आहेत.
advertisement
सिंह राशीच्या लोकांमध्ये समजूतदारपणा वाढेल, आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतील. जर तुमचा व्यवसाय बराच काळ मंदावलेला असेल, तर 15 जानेवारीनंतर त्यात गती येईल आणि चांगली प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. शुक्राच्या कृपेने नफा मिळेल आणि शनीच्या आशीर्वादाने स्थैर्य येईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतील आणि बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत बढतीचेही संकेत मिळतात.
advertisement
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा राजयोग धनलाभ देणारा ठरेल. नशीब तुमची साथ देईल आणि तुम्ही सुख-सुविधांचा आनंद घ्याल. धार्मिक किंवा शुभ कार्यांवर खर्च होऊ शकतो. जुने वाद, कोर्टकचेरी किंवा कायदेशीर अडचणी शनीच्या कृपेने सुटण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीही चांगली बातमी येऊ शकते. व्यवसायाच्या निमित्ताने लांबचा प्रवास होईल आणि परदेशी संपर्कातून फायदा होईल.
advertisement
मीन राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. करिअरमध्ये चांगली वाढ होईल आणि स्थैर्य येईल. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा 2026 मध्ये मिळेल, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्चावर नियंत्रण राहील आणि बचत वाढेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मित्र आणि भावंडांचं सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत तयार होतील, ज्यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










