Tourism : नवीन वर्षानिमित्त फिरायचा प्लॅन? छ. संभाजीनगरमधील कधीही न पाहिलेली 10 ठिकाणं

Last Updated:
नवीन वर्ष म्हटलं की आपल्यापैकी अनेक जण पर्यटनासाठी विविध ठिकाणी फिरायला जात असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये असे ठिकाण आहेत की तुम्ही एका दिवसामध्ये चार ते पाच ठिकाणी बघू शकता.
1/10
नवीन वर्ष म्हटलं की आपल्यापैकी अनेक जण पर्यटनासाठी विविध ठिकाणी फिरायला जात असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये असे ठिकाण आहेत की तुम्ही एका दिवसामध्ये चार ते पाच ठिकाणी बघू शकता. तर ही कुठले ठिकाण आहेत त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बीबी का मकबरा, पानचक्की, सिद्धार्थ उद्यान, घृष्णेश्वर, भद्रा मारुती खुलताबाद, वेरूळ लेणी येथे तुम्ही एका दिवसामध्ये फिरू शकता.

advertisement
2/10
‎घृष्णेश्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर वेरूळ लेण्यांपासून अगदी जवळ आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी देखील केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून हे मंदिर 30 किलोमीटर अंतरावर आहे.

3/10
‎भद्रा मारुती हे संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये आहे. शहरापासून 19 किलोमीटर अंतरावरती भद्रा मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. तसेच मारुती नवसाला पावणारा आहे, असं देखील म्हटलं जातं.

4/10
अजिंठा लेणी ह्या सोयगाव तालुका संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व 2 रे शतक ते इ.स. 4 थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात ह्या लेणी आहेत. यात 29 बौद्ध लेणी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून 100 ते 110 कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. भारताची जागतिक पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या लेणी म्हणून अजिंठाची ओळख आहे.

5/10
‎‎वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे.

6/10
बीबी का मकबरा या वास्तूला बांधण्यास सतराव्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हिचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. तिला जिथं दफन करण्यात आलं, तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा आहे.

7/10
रशियामधील गझनवाद येथून आलेले हजरत बाबा शहा मुसाफिर यांनी पानचक्की बांधली. या ठिकाणी सरया (धर्मशाळा) मशीद पाण्यासाठी भला मोठा हौद बांधण्यात आलेला आहे. पानचक्की सुमारे 17 व्या शतकातील आहे. या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किमीवरुन जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते.

8/10
दौलताबादचा किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला शहरापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. 11 व्या शतकात यादव राजा भिल्लमा पाचवा याने हा किल्ला बांधला होता. किल्ला जिथे आहे त्या जागेला पूर्वी देवगिरी या नावाने ओळखले जात.

9/10
सिद्धार्थ उद्यान हे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी आहे. या उद्यानामध्ये प्राणी संग्रहालय देखील आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये विविध प्राणी आहेत, वाघ, हरिण, कोल्हा असे प्राणी आहेत व हे उद्यान बघण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून लोक इथे येतात.

10/10
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बौद्ध लेण्या आहेत. बीबी का मकबरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती या लेणी आहेत. अतिशय प्राचीन अशा या लेण्या आहेत त्या देखील तुम्ही बघू शकता. तसेच म्हैसमाळ पाहू शकता.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement