वडिलांनी कुंडली बघून बनवलं क्रिकेटर, 'शर्माजी की बेटी' ठरली नॅशनल क्रश; विराटप्रमाणे तिलाही आठवतो 'बेन स्टोक्स'

Last Updated:
Who is Vaishnavi Sharma : वैष्णवी शर्मा चंबळ विभागातून भारतीय महिला टीममध्ये स्थान मिळवणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर ठरली आहे. विशेष म्हणजे, वैष्णवीच्या वडील ज्योतिषी आणि प्रोफेसर आहेत.
1/7
भारतीय महिला क्रिकेट टीम आणि श्रीलंका यांच्यातील 5 टी-ट्वेंटी मॅचेसच्या सीरिजमधील सलामीचा सामना नुकताच पार पडला. विशाखापट्टणमच्या मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये भारताने 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.

advertisement
2/7
या विजयासोबतच एका युवा खेळाडूच्या पदार्पणामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह पाहायला मिळत आहे. या 20 वर्षांच्या लेफ्ट आर्म स्पिनरने आपल्या पहिल्याच इंटरनॅशनल मॅचमध्ये 4 च्या इकॉनॉमीने बॉलिंग करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

3/7
या खेळाडूचे नाव वैष्णवी शर्मा असून ती मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरची राहणारी आहे. चंबळ विभागातून भारतीय महिला टीममध्ये स्थान मिळवणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर ठरली आहे. विशेष म्हणजे, वैष्णवीच्या वडील ज्योतिषी आणि प्रोफेसर आहेत.

4/7
वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या कुंडलीवरून तिच्यातील खेळाडू ओळखला होता. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच वैष्णवीने वयाच्या 5 व्या वर्षापासून बॅट आणि बॉल हातात घेतला. तिने ग्वाल्हेरच्या तानसेन क्रिकेट अकॅडमीमध्ये तासनतास सराव करून टीम इंडियात एन्ट्री मिळवलीये.

5/7
वैष्णवीने यापूर्वी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्या स्पर्धेत 17 विकेट्स घेऊन ती सर्वात यशस्वी बॉलर ठरली होती. तसेच घरगुती क्रिकेटमध्येही तिने दमदार कामगिरी केली.

6/7
वैष्णवीला जगमोहन डालमिया ट्रॉफीने सन्मानित करण्यात आलं आहे. या पहिल्या मॅचमध्ये जरी तिला विकेट मिळाली नसली, तरी तिने टाकलेल्या अचूक टप्प्यामुळे श्रीलंकन बॅटर्सना रन्स करणं कठीण झाले होतं.

7/7
दरम्यान, पहिल्या मॅचमध्ये वैष्णवीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती विराट कोहलीप्रमाणे बेन स्टोक्सची आठवण काढताना दिसली. आपली चूक समजल्यावर तिने झटकन तोंडावर हात देखील ठेवला होता.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement