India vs Pakistan शर्यंतीत गेम झाला, 'या' संघाने बाजी मारली, सूपर 8 मध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ सूपर 8 मध्ये पोहोचण्याची शर्यतीत आहे.पण त्याआधी मोठा गेम फिरला आहे. कारण दुसरीच टीम सूपर 8 मध्ये पोहोचली आहे. ही टीम नेमकी कोण आहे? ती कशी पोहोचली? हे जाणून घेऊयात.
South Africa vs New Zealand : श्रीलंकेच्या कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर उद्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान हे दोन्ही संघ सूपर 8 मध्ये पोहोचण्याची शर्यतीत आहे.पण त्याआधी मोठा गेम फिरला आहे. कारण दुसरीच टीम सूपर 8 मध्ये पोहोचली आहे. ही टीम नेमकी कोण आहे? ती कशी पोहोचली? हे जाणून घेऊयात.
खरं तर भारत पाकिस्तान सामन्याधी आज साऊत आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने साऊत आफ्रिकेसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य साऊथ आफ्रिकेने 17.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 7 विकेटने जिंकला आहे. त्यामुळे सलग तीन सामने जिंकून साऊथ आफ्रिका सूपर 8 मध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे.
advertisement
खरं तर पॉईंटस टेबलमध्ये नजर टाकली तर आतापर्यंच चार ग्रुपपैकी एकाही संघाचे या सामन्याआधी 6 गुण नव्हते. पण आता साऊथ आफ्रिका 3 सामन्यात 6 गुण मिळवून +1.477 नेट रनरेटसह सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. साऊथ आफ्रिकेचा शेवटचा सामना हा युएईशी असणार आहे. हा सामना जिंकू किंवा न जिंको याचा साऊथ आफ्रिकेवर काही एक परिणाम होणार नाही आहे.कारण ते आता सूपर 8 मध्ये पोहोचली आहे.
advertisement
विशेष म्हणजे पॉईंटस टेबलमध्य़े साऊथ आफ्रिका क्वालिफाय झाल्याची खून दाखवण्यात आली नाही आहे. पण कदाचीत ग्रुप स्टेजमधील सर्व सामने पार पडल्यानंतर ती खून दाखवण्याची शक्यता आहे.पण असे जरी असले तरी साऊथ आफ्रिला सूपर 8 मध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे.
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेकडून एनड मार्करनने 44 बॉलमध्ये 86 धावांची वादळी खेळी करून हा सामना फिरवला. यावेळी त्याला विजयात फार कुणाशी साथ मिळाली नाही.विशेष म्हणजे त्याने हे लक्ष्य 17.1 ओव्हरमध्ये गाठलं.
advertisement
न्यूझीलंडच्या डावाबद्दल बोलायच झालं तर मार्क चॅपमनने 48 धावांची सर्वाधिक खेळी केली.त्याच्या जोडीला फिन अलने 31 आणि डेरि मिचेलने 32 धावांची खेळी केली होती.या बळावर त्यांनी 175 धावांपर्यंत मजल मारली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 11:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India vs Pakistan शर्यंतीत गेम झाला, 'या' संघाने बाजी मारली, सूपर 8 मध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली









