शेवटच्या तासांत अजितदादांच्या गळाला मोठा मासा, पुण्यात भाजपला धक्का, चंद्रकांतदादांना नडलेला मोहरा राष्ट्रवादीत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune Mahanagar Palika Election: अमोल बालवडकर हे बाणेर-बालेवाडीमधून इच्छुक होते. विशेष म्हणजे याच प्रभागातून २०१७ ते २०२२ काळात ते नगरसेवक राहिले.
पुणे : पुणे महानगर पालिकेसाठी यंदा भारतीय जनता पक्षाने विशेष रणनीती आखली असून अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कापून नव्या चेहऱ्यांना रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा नेते, माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनाही पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या वादामुळेच त्यांना तिकीट देण्यासाठी पक्षाने नकार दिल्याचे बोलले जाते. ऐनवेळी तिकीट नाकारल्याने निराश झालेल्या अमोल बालवडकर यांनी जिजाई गाठून मनगटावर घड्याळ बांधले.
अमोल बालवडकर हे बाणेर-बालेवाडीमधून इच्छुक होते. विशेष म्हणजे याच प्रभागातून २०१७ ते २०२२ काळात ते नगरसेवक राहिले. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारीसाठी शेवटपर्यंत झुंजवले. निष्ठावंत असूनही पक्षाने दिलेल्या वागणुकीमुळे बालवडकर दुखावले गेले. त्यांनी अजित पवार यांना फोन करून पक्ष प्रवेशाची बोलणी केली. मंगळवारी दुपारी त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले.
चंद्रकांत पाटील यांना नडल्यानेच बालवडकर यांचे तिकीट कापले?
advertisement
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी अमोल बालवडकर हे इच्छुक होती. पक्षाकडे उमेदवारीसंदर्भात त्यांनी बोलणीही केली होती. परंतु पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. या सगळ्यात बालवडकर-चंद्रकांत पाटील यांच्यात छुपे युद्ध सुरू झाले. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी बालवडकर यांची समजूत काढून पुढील काळात न्याय देतो, असा शब्द दिला. परंतु महानगरपालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी डालवून उट्टे काढल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
advertisement
गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु उमेदवारांच्या नावांची घोषणा न झाल्याने वाट पाहावी लागेल, असे पक्षाकडून त्यांना सांगण्यात आले. अर्ज भरायला २४ तास उरलेले असतानाही पक्षाकडून त्यांना कोणताही निरोप न आल्याने बालवडकर यांनी अजित पवार यांना संपर्क करून उमेदवारी मागितली. अजित पवार यांनीही तत्काळ होकार दर्शवला.
पक्षप्रवेशानंतर बालवडकर काय म्हणाले?
advertisement
पक्षाने माझ्यासोबत दगा फटका केला. शेवटच्या क्षणांपर्यंत मला झुंजवले. ऐनवेळी मला तिकीट नाकारले. त्यानंतर मी अजित पवार यांना संपर्क करून बोलणी केली. त्यांनीही मोठ्या मनाने प्रवेश देऊन उमेदवारी दिली. यात माझे काहीही नुकसान झालेले नाही, पक्षाचे नुकसान झाले, असे बालवडकर म्हणाले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेवटच्या तासांत अजितदादांच्या गळाला मोठा मासा, पुण्यात भाजपला धक्का, चंद्रकांतदादांना नडलेला मोहरा राष्ट्रवादीत










