1,89,900 रुपयाची ऑर्डर, 54 हजारांची टिप; Zepto च्या रिपोर्टने उघड केलं भारतीयांचं ‘2025 शॉपिंग सीक्रेट’
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या एका वर्षात भारतीयांनी केवळ खरेदीच केली नाही, तर नवनवीन विक्रमही प्रस्थापित केले आहेत. चला तर मग, या रंजक अहवालातील काही भन्नाट गोष्टी जाणून घेऊया.
मुंबई : काही वर्षांपूर्वी जर कोणी म्हटलं असतं की, घरातलं दूध संपल्यावर किंवा पाहुणे आल्यावर 10 मिनिटांत किराणा सामान दारात हजर असेल, तर आपला विश्वास बसला नसता. पण 2025 मध्ये मात्र आता या गोष्टी भारतीयांच्या सवयीचा भाग झाल्या आहेत. आज आपण भाजीपाल्यापासून ते आयफोनपर्यंत आणि दुधापासून ते चार्जिंग केबलपर्यंत सर्व काही 'क्विक कॉमर्स'द्वारे मागवत आहोत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'Zepto Shopping Trends 2025' च्या आकडेवारीने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. या एका वर्षात भारतीयांनी केवळ खरेदीच केली नाही, तर नवनवीन विक्रमही प्रस्थापित केले आहेत. चला तर मग, या रंजक अहवालातील काही भन्नाट गोष्टी जाणून घेऊया.
2025 मध्ये Zepto हे ॲप तब्बल 3,46,41,64,197 वेळा उघडले गेले. यावरून हे स्पष्ट होतं की, लोक आता फेसबुक-इन्स्टाग्रामपेक्षाही जास्त वेळ किराणा सामानाच्या लिस्टवर घालवत आहेत.
advertisement
विशेष म्हणजे, या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी डिलिव्हरी पार्टनर्सनी एकूण 24.5 कोटी किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केले. हे अंतर म्हणजे पृथ्वीभोवती सलग 11 वर्षे विमान प्रवास करण्यासारखे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वर्षातील सर्वात वेगवान डिलिव्हरी अवघ्या 48 सेकंदात पूर्ण झाली.
बचत किती झाली?
झटपट सेवेसाठी लोक जास्त पैसे मोजतात असा एक समज आहे, पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. 2025 मध्ये स्मार्ट शॉपिंग आणि ऑफर्समुळे भारतीय ग्राहकांनी Zepto वरून खरेदी करताना तब्बल 17,000 कोटी रुपयांची बचत केली आहे.
advertisement
अनोखे युजर्स: एकाच ऑर्डरमध्ये पावणेदोन लाख खर्च.
मुंबईच्या यासिन नावाच्या व्यक्तीने एकाच वेळी 1,89,900 रुपयांची ऑर्डर देऊन सर्वांना थक्क केले.
राजकुमार एल. नावाच्या ग्राहकाने वर्षाभरात 5,894 ऑर्डर्स दिल्या. म्हणजे दिवसाला सरासरी 16 ऑर्डर्स
गुरुग्रामच्या प्रियांशुने एका डिलिव्हरी पार्टनरला 54,000 रुपयांची टिप देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.
शहरानुसार बदललेली 'चव'
शहरांनुसार लोकांच्या आवडीनिवडी कशा बदलतात, याचे उत्तम उदाहरण या अहवालात मिळते
advertisement
बेंगळुरू (टेक हब): इथे नंदिनी दूध आणि टोमॅटोची सर्वाधिक मागणी होती. पण गंमत म्हणजे, शेवटच्या क्षणी बॅटरी संपल्यामुळे की काय, तब्बल 69,177 टाइप-सी चार्जिंग केबल्स मागवण्यात आल्या. तसेच 5,279 वेळा कॉफी आणि झोपेसाठीच्या 'मेलाटोनिन गमीज' एकत्र ऑर्डर झाल्या.
मुंबईत अमूल दूध आणि कांद्याला पसंती होती. मुंबईकरांनी 7.84 लाख लीटर एनर्जी ड्रिंक्स फस्त केली.
advertisement
दिल्लीत उत्तर आणि दक्षिण असा फरक स्पष्ट दिसला. उत्तर दिल्लीने 'पेरू' (Guava) निवडला, तर दक्षिण दिल्लीच्या हाय-फाय वस्तीत 'एव्होकॅडो'ला (Avocado) पसंती मिळाली.
डाएटला 'कल्टी': साखर आणि गोडधोड एकत्र
हैदराबादमध्ये एक रंजक कल दिसला. 682 वेळा 'शुगर-फ्री' प्रोडक्ट्स आणि 'मिठाई' एकत्र ऑर्डर करण्यात आली. याचा अर्थ असा की, लोकांनी डाएट करण्याचा संकल्प केला खरा, पण मिठाईचा मोह काही त्यांना आवरला नाही.
advertisement
2025 चे हे कल दाखवतात की, 'क्विक कॉमर्स' आता केवळ चैनीची गोष्ट उरली नसून ती आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली आहे. वेगासोबतच वैविध्य आणि बचत यामुळे भारतीयांनी या 10 मिनिटांच्या जादूला आपलंसं केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
1,89,900 रुपयाची ऑर्डर, 54 हजारांची टिप; Zepto च्या रिपोर्टने उघड केलं भारतीयांचं ‘2025 शॉपिंग सीक्रेट’










