Best Bus: थर्टीफर्स्टच्या रात्री मुंबईकरांसाठी बेस्ट धावणार, कोणकोणत्या मार्गावर धावणार 'ही' बस

Last Updated:

नागरिकांची रेलचेल पाहता रेल्वेनंतर आता बेस्ट बसने देखील थर्टीफस्टच्या रात्री मुंबईकरांसाठी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Best Bus: थर्टीफर्स्टच्या रात्री मुंबईकरांसाठी बेस्ट धावणार, कोणकोणत्या मार्गावर धावणार 'ही' बस
Best Bus: थर्टीफर्स्टच्या रात्री मुंबईकरांसाठी बेस्ट धावणार, कोणकोणत्या मार्गावर धावणार 'ही' बस
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच सार्वजनिक वाहतूक नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनंतर आता बेस्ट बस सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बांद्रा बँडस्टँडसह मुंबई आणि उपनगरांतील वेगवेगळ्या ठिकाणी लोकं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जात असतात. शिवाय, पर्यटनस्थळी देखील अनेक नागरिक भेट देत असतात. नागरिकांची रेलचेल पाहता रेल्वेनंतर आता बेस्ट बसने देखील थर्टीफस्टच्या रात्री मुंबईकरांसाठी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. थर्टीफस्टच्या रात्री मुंबई फिरण्याचा जर तुमचा देखील प्लॅन असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई आणि उपनगरांत असलेल्या समुद्र किनारी आणि वेगवेगळ्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत असते. पर्यटकांची आणि मुंबईकरांची थर्टीफर्स्टच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. हेच गर्दीचं मुख्य कारण लक्षात घेत बेस्टने नवीन वर्षाच्या आदल्या रात्री अतिरिक्त 25 बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थर्टीफर्स्टला रात्री उशिरापर्यंत हेरिटेज टूर सह अन्य ठिकाणी प्रवास करता येईल. ही बस सेवा प्रवाशांना 31 डिसेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपासून सुरू होणार आहे, जी 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. या हेरिटेज टूरमुळे पर्यटकांना मुंबईतील अनेक ठिकाणांचं दर्शन होणार आहे. वेगवेगळ्या मार्गांवर एकूण 25 बसेस चालवले जाणार आहेत.
advertisement
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, गोराई, मार्ते, दादर चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बांद्रा बँडस्टँडसह अन्य ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमांतर्फे विविध बसमार्गांवर रात्री 25 जादा बस सोडण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार अधिक बस सोडण्यात येतील. याशिवाय हेरिटेज दूर बसही 31 डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजतापासून 1 डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, बेस्टच्या या उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू, गोराई समुद्रकिनारा, चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
advertisement
कोणकोणत्या मार्गावर बससुविधा मिळणार?
  • ए २१- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते देवनार आगार बससंख्या - 3
  • सी ८६- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते वांद्रे बसस्थानक (प.) बससंख्या - 3
  • ए ११२- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) : बससंख्या - 4
  • ए ११६- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) ते सीएसएमटी. बससंख्या - 5
  • २०३- अंधेरी स्थानक (प): जुहू बीच - 2
  • २३१- सांताक्रुझ (प) - जुहू बस स्थानक - 4
  • ए २४७ आणि ए २९४ बोरिवली स्टेशन ते गोराई बीच आणि गोराई बीच ते बोरिवली स्टेशन - 2
  • २७२- मालाड स्टेशन - मार्वे बीच - 2
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Best Bus: थर्टीफर्स्टच्या रात्री मुंबईकरांसाठी बेस्ट धावणार, कोणकोणत्या मार्गावर धावणार 'ही' बस
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement