Ravindra Dhangekar : 'महायुतीच्या नेत्यांवर बोलणे टाळा', एकनाथ शिंदे यांचा रविंद्र धंगेकरांना आदेश
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भेटीत नेमक्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविद्र धंगेकर यांना काय सुचना केल्या आहेत,याचा तपशीलवार समोर आला आहे.
Eknath Shinde on Ravindra Dhangekar : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहारावरून शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघर्ष पेटवला होता. त्यानंतर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर मंगळवारी रविंद्र धंगेकर यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या भेटीत नेमक्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविद्र धंगेकर यांना काय सुचना केल्या आहेत,याचा तपशीलवार समोर आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी धगेकरांना काय सुचना केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
वरिष्ठ सुत्रांची दिलेल्या माहितीनुसार, जैन बोर्डींग हाऊसच्या व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकरांना प्ररकर सबुरी ने घ्या अशी सुचना केली आहे. तसेच आपण नेहमीच अन्यायाच्या विरोधात लढा दिलाय. पण महायुती मधील वातावरण बिघडेल आणि महायुतीत मिठाचा खडा पडेल असं काही करू नका. आणि महायुतीच्या नेत्यांवर बोलणे टाळा,असा कानमंत्र एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकरांना दिला आहे.
advertisement
ज्या ज्या वेळी अडचण असेल तेव्हा मी तुमच्या सोबतच असेन पण पक्षाला व वरिष्ठांना एखाद्या प्रकरणावर भाष्य करत असताना चर्चा करावी व त्या बाबात भुमिका घ्यावी.परस्पर न सांगता कोणतीही गोष्ट करू नका याचा फटका पक्षासह महायुतीला बसेल,अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी धगेकरांना समज दिली आहे.
रविंद्र धंगेकर काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी मला नेहमी सांगितले की महायुतीतील पक्षावर बोलायचे नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार मी पक्षावर न बोलता प्रवृ्त्तीवर बोलत राहिलो. तसेच एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत परवा चर्चा केली आणि आम्ही मार्ग काढला, असे एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.
advertisement
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील टीकेसंदर्भात विचारले असता, शाह यांच्यावर मी कोणतीही टीका केलेली नाही. आजही मला एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी विचारणा केल्यावर मी टीकेचा इन्कार केला. मात्र काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने भांडवल करण्याचा प्रयत्न करतात. शिंदे साहेबांनी मला काहीतरी बोलावे, चिडावे, रागवावे यासाठी काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे नाव घेणे त्यांनी टाळले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 11:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ravindra Dhangekar : 'महायुतीच्या नेत्यांवर बोलणे टाळा', एकनाथ शिंदे यांचा रविंद्र धंगेकरांना आदेश


