Latur Crime : कॉलेजच्या फ्रेशर पार्टीत तुफान राडा, दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, पोलिसांना 6 विद्यार्थ्यांना उचललं, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
फ्रेशर्स पार्टी दरम्यान दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्यादरम्यान झालेल्या हाणामारीत एका तरूणाचा मृत्यू झाला होता.सूरज शिंदे असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Latur Crime News : शशिकांत पाटील, लातूर : लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शहरातील एमआयडीसी परिसरात जीवनरेखा फाउंडेशन डी.एम.एल.टी. महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. या फ्रेशर्स पार्टी दरम्यान दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या राड्यादरम्यान झालेल्या हाणामारीत एका तरूणाचा मृत्यू झाला होता.सूरज शिंदे असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात जीवनरेखा फाउंडेशन डी.एम.एल.टी. महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात धक्काबुक्की झाली होती.या धक्काबुक्कीचे पर्यावसन लाठ्या काठ्यांनी हाणामारीत झाले. ही घटना महाविद्यालयाच्या गेट बाहेर घडली होती. या मारहाणीत डीएमएलटी महाविद्यालयातील सुरज शिंदे या विद्यार्थ्याला काठीने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या सुरज शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर आरिफ गौस मियां शेख हा गंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू आहेत.
advertisement
या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर इम्रान माजीद पटेल उर्फ पठाण, रेहान अल्लाउद्दीन शेख, रोशन माजिद पटेल, मुक्रम जमाल शेख, शहाबाद गफार शेख आणि प्रीतम उर्फ मोन्या दत्ता करंजीकर या सहा आरोपींना लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.आरोपींमध्ये दोन विद्यार्थी हे डी.एम.एल.टी. महाविद्यालयाचे आहे तर एक विद्यार्थी हा छत्रपती संभाजीनगर येथील बी ए एम एस चे शिक्षण घेतो. तर तीन आरोपी हे लातूर शहरातील आहेत.
advertisement
या घटनेत चार आरोपींना पोलीस कोठडी तर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान याप्रकरणी अधिकचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Latur,Maharashtra
First Published :
October 24, 2025 9:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur Crime : कॉलेजच्या फ्रेशर पार्टीत तुफान राडा, दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, पोलिसांना 6 विद्यार्थ्यांना उचललं, नेमकं काय घडलं?


