TRENDING:

Ratan Tata Will: टाटांनी मृत्यूपत्रात उल्लेख केलेली मोहिनी कोण? जिच्या नावावर 500 कोटींची संपत्ती

Last Updated:

दत्ता स्वतःला टाटा कुटुंबाच्या सदस्यांच्या जवळच्या मानत होत्या. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारात दत्ता यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांची आणि रतन टाटा यांची पहिली भेट जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये झाली होती.

advertisement
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या वसीयतनाम्याने त्यांच्या निकटच्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. टाटा कुटुंबाचे संरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांनी आपली बहुतेक संपत्ती दान करण्यासाठी दिली असली, तरी काही भाग त्यांनी अशा व्यक्तीला दिला आहे, ज्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
News18
News18
advertisement

कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?

जमशेदपूरच्या मूळ निवासी आणि पर्यटन उद्योजक असलेल्या मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव रतन टाटा यांच्या वसीयतनाम्यात आहे. हे नाव टाटा कुटुंबासाठीही आश्चर्याचं होतं. दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाची 'स्टॅलियन' नावाची ट्रॅव्हल एजन्सी होती. 2013 मध्ये या कंपनीचं 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स'च्या 'ताज सर्व्हिसेस'मध्ये विलीनीकरण झालं. त्यावेळी 'स्टॅलियन'मध्ये दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाची 8०% भागीदारी होती, तर उर्वरित टाटा इंडस्ट्रीजकडे होती. त्यांनी 'टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेस'च्या संचालक म्हणूनही काम केलं आहे. ही कंपनी 'थॉमस कूक'ची जुनी सहयोगी कंपनी होती.

advertisement

कसं होतं रतन टाटा आणि मोहिनी दत्तांचं नातं?

रतन टाटा यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींच्या माहितीनुसार, दत्ता बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या सहकारी होत्या आणि कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्या माहीत होत्या. दत्ता यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी २०२४ पर्यंत नऊ वर्षे 'टाटा ट्रस्ट्स'मध्ये काम करत होती. यापूर्वी त्यांनी 'ताज हॉटेल्स'मध्येही काम केलं आहे.

advertisement

दत्ता स्वतःला टाटा कुटुंबाच्या सदस्यांच्या जवळच्या मानत होत्या. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारात दत्ता यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांची आणि रतन टाटा यांची पहिली भेट जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये झाली होती. त्यावेळी रतन टाटा 24 वर्षांचे होते. रतन टाटा यांनी त्यांची मदत केली आणि त्यांना पुढे जाण्यास मदत केली, असंही त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे दोघेही सुमारे 60 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईतील एनसीपीए येथे आयोजित रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठीही दत्ता यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

advertisement

संपत्तीचं वाटप कसं होणार?

रतन टाटा यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा धर्मादाय कार्यांसाठी समर्पित आहे. त्यांच्या सावत्र बहिणी, ज्या लाभार्थी म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या, त्यांनीही आपला हिस्सा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कायदेशीर तज्ज्ञांना मालमत्तेच्या वितरणाची बारकाईने तपासणी करायची आहे.

रतन टाटा यांची संपत्ती किती?

रतन टाटा यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्यांची संपत्तीचा एक महत्त्वपूर्ण भाग दान करण्यासाठी दोन संस्था - 'रतन टाटा एन्डॉवमेंट फाउंडेशन' आणि 'रतन टाटा एन्डॉवमेंट ट्रस्ट' तयार केल्या होत्या. वेगवेगळ्या अंदाजानुसार, टाटा समूहाची होल्डिंग कंपनी 'टाटा सन्स'मध्ये त्यांची ०.८३% थेट भागीदारी होती आणि त्यांची एकूण संपत्ती सुमारे ८,००० कोटी रुपये होती. 'टाटा सन्स'च्या शेअर्सव्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे फेरारी आणि मासेरातीसह अनेक लक्झरी कार, महागडी पेंटिंग्ज, स्टार्टअप्समध्ये शेअर्स आणि इतर गुंतवणूकही आहेत. रतन टाटा यांच्या 'आरएनटी असोसिएट्स' या खासगी गुंतवणूक संस्थेने २०२३ पर्यंत १८६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. रतन टाटा यांच्या संपत्तीच्या वितरणाची काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे ६ महिने किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Ratan Tata Will: टाटांनी मृत्यूपत्रात उल्लेख केलेली मोहिनी कोण? जिच्या नावावर 500 कोटींची संपत्ती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल