आरबीआयच्या नवीन नियमांबद्दल जाणून घ्या
आरबीआयने निर्देश दिले आहेत की, बँकांनी नॉमिनेशन फॉर्म मिळाल्यापासून तीन कामकाजाच्या दिवसांत पावती द्यावी आणि पासबुक किंवा मुदत ठेव पावतीवर 'नामांकन नोंदणीकृत' असे चिन्हांकित करावे. पारदर्शकता राखण्यासाठी खात्याच्या रेकॉर्डमध्ये नामांकित व्यक्तीचे नाव नोंदवणे देखील आवश्यक असेल.
स्वतःचं घर खरेदी करणं बेस्ट की रेंटवर राहणं? फायनेंशियल एक्सपर्टचा महत्त्वाचा सल्ला पाहाच
advertisement
ग्राहकांना ही सुविधा मिळेल
ग्राहकांना नॉमिनेशन नोंदणी, रद्द किंवा सुधारित करण्याचा पर्याय देखील दिला जाईल आणि बँकेला प्रत्येक बदलाचा लेखी पुरावा देणे आवश्यक असेल. बँकेने कोणत्याही कारणास्तव नॉमिनेशन नाकारले तर त्यांना तीन कामकाजाच्या दिवसांत ग्राहकांना लेखी कळवावे लागेल.
SEBIचं म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट! फीस स्ट्रक्चरमध्ये होणार बदल
आरबीआयने असेही स्पष्ट केले आहे की, जर खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी व्यक्ती असतील आणि त्यापैकी एकाचा पैसे मिळण्यापूर्वी मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे नामांकन आपोआप रद्द मानले जाईल. ही मार्गदर्शक तत्त्वे आरबीआयच्या पूर्वीच्या तरतुदींशी सुसंगत आहेत ज्यात मृत ग्राहकांचे दावे 15 दिवसांच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे. वैध नॉमिनेशन किंवा उत्तरजीवी कलम असल्यास, खातेधारकाच्या मृत्यूनंतर बँक थेट नॉमिनी व्यक्तीला किंवा वारसाला निधी जारी करू शकते.
