शेअर मार्केटपेक्षा रॉबर्ट जास्त सोनं, चांदी आणि बिटकॉइनवर फोकस करताना दिसले. त्यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करुन एक इशारा दिला आहे. येणाऱ्या काळात मार्केटमध्ये भयंकर काहीतरी घडू शकतं, त्यामुळे मार्केट कोसळण्याची शक्यता आहे. 1971 पासून मी सोनं खरेदी करत आहे. मात्र अद्याप ते विकायला काढलं नाही. मी आताही ते विकण्याच्या भानगडीत न पडता त्यामध्ये अधिक गुंतवणूक कशी करता येईल यावर फोकस करतो.
advertisement
कियोसाकी यांनी दिला अलर्ट
मार्केटमध्ये भयंकर क्रॅश होणार आहे. मी सोनं विकत नाही तर खरेदी करत आहे. सोन्यासाठी माझे टार्गेट प्राइज 27000 हजार डॉलर औस असेल. माझ्या मित्राकडे दोन सोन्याच्या खाणी आहेत. त्याने भविष्यात सोनं आणखी वाढेल ते आता कमी होणार नाही असं भाकीत केलं आहे. 1971 पासून कियोसाकी हे सोनं खरेदी करत आहेत.
रॉबर्ट यांच्या मते सिस्टिममध्ये जेव्हा बनावट नोटा किंवा पैसा येतो तेव्हा खऱ्या नोटा किंवा पैसे कुठेतरी लपवून ठेवलेले असतात. त्यांनी 2026 साठी बिटकॉइनचे टार्गेट सेट केले आहेत. साधारण 2026 रोजी बिटकॉइनच्या किंमती 250000 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. चांदीसाठी 100 डॉलर टार्गेट देण्यात आलं आहे. क्रेप्टोकरन्सी आणि सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
अमेरिकन ट्रेझरी आणि फेडवर टीका
कियोसाकी यांनी अमेरिकेच्या ट्रेझरी आणि फेडरल रिझर्व्हवर थेट टीका केली आहे. ते म्हणाले की, दुर्दैवाने दोघंही ठरलेले नियम पाळत नाहीत. ते बिलं भरण्यासाठी खोटं चलन छापतात. आपण असं केलं असतं, तर तुरुंगात गेलो असतो. ते पुढे म्हणाले की ते पैशांशी संबंधित सर्व मूलभूत आर्थिक नियम पाळतात आणि ग्रेशम तसेच मेटकाफच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवतात.
बचत करणारे हरतात, सोनं-सिल्व्हर घेत राहा
कियोसाकी यांनी अमेरिकेच्या वाढत्या कर्जावरही इशारा दिला. ते म्हणाले की, अमेरिका आज जगातील सर्वात मोठा कर्जदार देश बनलाय. म्हणून मी वारंवार सांगतो. सेव्हिंग करणारे हरतात, कारण चलनाचं मूल्य दररोज घसरत आहे. त्यामुळे पैसे ठेवण्यापेक्षा ते गुंतवले तर त्यातून फायदा जास्त मिळतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, मी सोनं, चांदी, बिटकॉइन आणि इथरियम खरेदी करत राहीन. कारण पुढे खूप पैसा येणार आहे आणि जो तयार असेल, तोच जिंकेल.
डिस्क्लेमर- बचत पेक्षा गुंतवणूक करा, मार्केटपेक्षा सोनं, चांदी, बिटकॉईन हे जरी क्रॅश झाले तरीसुद्धा भविष्यात त्यामध्ये सर्वात जास्त पैसा आहे असं रॉबर्ट कियोसाकी यांनी सल्ला दिला आहे. अर्थात हा त्यांचा खासगी सल्ला आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कोणत्याही फायद्या-तोट्याची जबाबदारी न्यूज 18 मराठीची नसेल.
