सिंधुदुर्ग : बदलत्या काळानुसार पिठाच्या गिरणीची रूपरेषा बदलली असली तरीही भारतात पिठाच्या गिरणीचा व्यवसाय शतकानुशतके सुरू आहे. हा व्यवसाय कधीही न थांबणारा व्यवसाय आहे कारण पिठाचा वापर कधीही संपू शकत नाही. याचं पिठाच्या व्यवसायातून प्रसाद मालपेकर हा तरुण लाखोंची कमाई करत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील प्रसाद मालपेकर या तरुणाने हा पिठाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. प्रसाद याच्या वडिलांनी 30 वर्षा पूर्वी 1 गिरण पिठाची चालू केली होती, शेती व्या व्यावसाय सांभाळत ते गिरण सांभाळत होते. नंतर त्यांना पीठ विक्री करण्याचा व्यावसाय करण्याची संकल्पना सुचली आणि पीठ विक्रीचा व्यावसाय करण्यास सुरुवात केली.
advertisement
उच्चशिक्षित तरुण करतोय शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संत्रा शेती, एकरी 2 लाखांचे मिळवतोय उत्पन्न
सुरुवातीच्या काळात दिवसाला 10 -12 किलो पीठ विक्री करत होते मात्र नंतर हळू हळू व्यवसायात बदल करून आज त्यांनी तीन गिरणी टाकल्या आहेत. हा व्यवसाय त्यांचा मुलगा प्रसाद मालपेकर हा सांभाळत आहे. या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत आज दिवसाला 400-500 किलो पिठाची ते विक्री करत आहेत. लोकल हॉटेलवाले, दुकानदार मोठ्या प्रमाणात या पिठाची मागणी करतात. या पिठामध्ये बाजरी, गहू, तांदूळ, मका, कुळीद अशी सर्व प्रकरची पीठे तयार करून विकतात.
या व्यवसायाविषयी सांगताना ते सांगतात की, या व्यवसायातून एक रोजगार निर्मितीचे काम करण्याचा उद्देश आहे. या व्यवसायातून महिन्याकाठी एक ते दिड लाखांचा आर्थिक फायदा तर होतोच पण एक मनाचे समाधान देखील होते. कोकणातील तरुणांनी देखील अशा व्यवसायात उतरावे. इथल्या तरुणांनी मुबंई, पुणे अशा शहरात नोकरीसाठी न जाता उद्योगधंद्यात उतरावे. कोकणात अनेक उद्योगधंदे करण्यासारखे आहेत. इतर शहारामध्ये जाऊन 20-30 हजाराच्या नोकऱ्या करण्यापेक्षा व्यवसायातून नफा कमवावा असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे.