स्मॉल सेव्हिंग स्किम्सवरील व्याजदर
सरकारी अधिसूचनेनुसार, सर्वात लोकप्रिय स्मॉल सेव्हिंग स्किम्स असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींवर 8.2 टक्के व्याजदर असेल, तर तीन वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर चालू तिमाहीप्रमाणेच 7.1 टक्के राहील. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि पोस्ट ऑफिस बचत अकाउंट योजनेसाठी व्याजदर अनुक्रमे 7.1 टक्के आणि 4 टक्के राहील. शिवाय, किसान विकास पत्र (केव्हीपी) वरील व्याजदर 7.5 टक्के राहील, ज्याचा गुंतवणूक कालावधी 115 महिन्यांपर्यंत पोहोचेल.
advertisement
क्रेडिट कार्ड यूझर्सला मोठा अलर्ट! तुम्हीही करत असाल ही चूक तर सावधान
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर व्याज
जानेवारी-मार्च तिमाहीसाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर व्याजदर 7.7 टक्के राहील. चालू तिमाहीप्रमाणेच, मासिक उत्पन्न योजना चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत गुंतवणूकदारांना 7.4 टक्के रिटर्न देईल. शिवाय, पोस्ट ऑफिस आणि बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या लघु बचत योजनांवरील व्याजदर सलग सातव्या तिमाहीत अपरिवर्तित राहिले आहेत. यापूर्वी, सरकारने 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत काही योजनांवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली होती.
FDवरील व्याजदर
आरबीआयच्या व्याजदर कपातीनंतर, अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी त्यांचे एफडी दर सुधारले आहेत. आम्ही तुम्हाला लेटेस्ट दरांबद्दल माहिती देतो.
एसबीआय बँक
पैसा बाजारच्या रिपोर्टनुसार, देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेली एसबीआय 7 दिवसांपासून 10 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य लोकांसाठी वार्षिक 3.05%-6.45% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 3.55%-6.95% पर्यंत एफडी व्याजदर देते. एसबीआय टॅक्स सेव्हिंग्ज एफडी व्याजदर सामान्य लोकांसाठी वार्षिक 6.05% आणि ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांसाठी वार्षिक 7.05% आहेत.
अॅक्सिस बँक
अॅक्सिस बँक 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांसाठी वार्षिक 3.00-6.45% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50-7.20% व्याजदर देते. बँक सर्वसामान्यांसाठी वार्षिक 6.45% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांसाठी 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 7.20%दराने टॅक्स सेव्हिंग करणारी एफडी देखील देते.
HDFC बँक
एचडीएफसी बँक 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांसाठी वार्षिक 2.75-6.45% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 3.25-6.90% दराने एफडी देते. बँक सर्वसामान्यांसाठी वार्षिक 6.40%दराने आणि ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांसाठी 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 6.90% दराने टॅक्स-सेव्हिंग करणारी एफडी देते.
ICICI बँक
याव्यतिरिक्त, आयसीआयसीआय बँक ही एक प्रमुख खाजगी क्षेत्रातील बँक आहे, जी सामान्य जनतेला वार्षिक 2.75-6.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 3.25-7.10% दराने 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी देत आहे. बँक सामान्य जनतेला वार्षिक 6.50%दराने आणि ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांना 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 7.10% दराने टॅक्स-सेव्हिंग एफडी देत आहे.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सामान्य जनतेला वार्षिक 3.00-6.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 3.50-7.00% दराने 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी व्याजदर देत आहे. सध्या, पीएनबी कर-बचत एफडीवरील व्याजदर सामान्य जनतेसाठी वार्षिक 5.85%-6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 6.35%-6.75% आहेत.
