नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांचीच वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. नोएल टाटा हे नवल टाटा आणि समोन टाटा यांचे सुपुत्र आहेत. नोएल टाटा यांचा जन्म 1957 साली झाला होता. त्यांनी यूकेमधील ससेक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि फ्रान्स येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमाचा पाठपुरावा केला. नोएल टाटा यांच्या कारकीर्दीची सुरवात टाटा इंटरनॅशनलपासून झाली. ते व्यवस्थापकीय संचालक बनले. त्या काळात अनेक मोठे निर्णय घेतले आणि विविध क्षेत्रांमध्ये विविधता तयार करून जागतिक मार्टेकमध्ये नवी उंची मिळवून दिली.
advertisement
पुढे 1999 मध्ये त्यांनी वेस्टसाइड आणि स्टार बझार यांच्यासारख्या कंपन्यांच्याव्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळली. नोएल टाटा गेल्या 40 वर्षांपासून टाटा समूहाचा हिस्सा आहेत. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक मंडळाचे सदस्य होते. आता ते थेट अध्यक्ष झाले आहेत. नोएल टाटा हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष देखील आहेत.
नोएल टाटा हे टाटा स्टील अँड टायटन कंपनी लिमिटेडमध्ये ते उपाध्यक्ष देखील होते. तब्बल 11 वर्ष त्यांनी ट्रेंडच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी कंपनीची वाढ तब्बल 600 पटीने झाली. अशातच आता त्यांच्याकडे रिटेल, ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसारख्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय वाढण्याची संधी असणार आहे.
नोएल टाटा यांचे लग्न टाटा सन्सचे शेअर होल्डर असलेल्या पालोनजी मिस्त्री यांची कन्या अललू मिस्त्री यांच्याशी झाला होता. त्यांना तीन मुलं आहेत. लेआ, माया आणि नेव्हिल टाटा अशी त्यांची नावं आहेत. आता नोएल टाटा यांच्या खांद्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी आली असल्याने त्यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, रतन टाटा यांची सामाजिक भान असलेले उद्योजक म्हणून ओळख होती. अशातच आता सामाजिक कार्यात टाटा समुहाची वाटचाल कशी असेल? यावर देखील भर दिला जाऊ शकतो.