घराबाहेर जाताना कुणाला ठाऊक होतं हे घडेल?
नवी मुंबईच्या पनवेलमधून 25 वर्षीय महिला तिच्या तीन वर्षांच्या मुलासह अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे परिसराच मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव रितिका अजय गायकर असे आहे तर तिच्यासोहत तिचा तीन वर्षांचा चिमुकला मुलगा देखील गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी घरातून बाहेर गेल्यापासून तिचा कोणताही संपर्क होत नाही, त्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत.
advertisement
शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना
या प्रकरणी पनवेल पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी माय-लेकाचा तातडीने तपास सुरु केला असून जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि महिला आणि मुलाचा शोध घेण्यासाठी काही पथके तयार करण्यात आली आहेत.
पोलिसांनी आणि कुटुंबीयांनीही नातेवाईक आणि जवळच्या लोकांमध्ये चौकशी सुरु केली आहे. पण अजूनही दोघांची काही माहिती मिळाली नाही.
