कसे असतील मेट्रोचे टप्पे
दहिसर ते काशीगाव मधील मेट्रो 9 मार्गिकेचा पहिला टप्पा शिवाय डायमंड गार्डन ते मंडाले या मेट्रो 2 ब च्या मार्गिकेचा पहिला टप्पा हा आज सुरु केला जाणार आहे. विशेष म्हणजे या लोकापर्णाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील, उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार असून बुधवारपासून म्हणजे 8 एप्रिलपासून दोन्ही मार्गिका या प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येतील.
advertisement
नव्या मेट्रोमुळे आता काशीगाव ते अंधेरी असा थेट प्रवास करणे प्रवाशांना शक्य होणार आहे आणि प्रवाशांना दहिसर येथे बदल करुन मेट्रो 2 अ या मार्गिकेने अंधेरीपर्यंतही सहज पोहोचता येणार आहे, त्यामुळे पश्चिम उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील दररोज कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.
इथं होतेय पहिल्यांदा मेट्रो?
मुंबईच्या पूर्व उपनगरातही पहिल्यांदाच मेट्रोचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. डायमंड गार्डन ते मंडाले या टप्प्यामुळे मानखुर्द, चेंबूर या परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. शिवाय या भागातील प्रवास रस्त्याने होत असल्याने दररोज वाहतूककोंडीची मोठी समस्या जाणवते पण आता मेट्रो सेवेमुळे प्रवास हा गर्दीमुक्त आणि सोपा, वेगवान होईल.
एमएमआरडीएच्या एकूण 14 मेट्रो प्रकल्पांपैकी सध्या अवघ्या चारच मार्गिका सुरु आहेत. तर नव्या दोन मार्गिकांमुळे सुरु असलेल्या मेट्रो मार्गिकांची संख्या आता सहा होणार आहे.
चला तर जाणून घ्या मेट्रोचे वेळापत्रक
1) काशीगाव ते गुंदवली, अंधेरी ( मार्गिका 9 आणि 2 अ)
-पहिली गाडी : पहाटे 5.50 वाजता
- शेवटची गाडी: रात्री 11.00 वाजता
- गर्दीच्या वेळी: दर 6 मिनिटांनी
-इतर वेळी: 8 ते 10 मिनिटांनी
2) मेट्रो 2 अ मार्गिकेचे सुधारित वेळापत्रक
-पहिली गाडी : पहाटे 5.50 ते 5.55 वाजता
-शेवटची गाडी :रात्री 10.35 - 11.00 वाजता
-गर्दीची वेळी गाड्या : 6 मिनिटांच्या अंतराने
-इतर वेळी गाड्या : 8 ते 10 मिनिटे
3) डायमंड गार्डने ते मंडाले मार्गिकेचे वेळापत्रक (मेट्रो 2 ब)
-पहिली गाडी : सकाळी 6.00 वाजता
-शेवटची गाडी : रात्री 10.15- 13.30
-गाडीच्या एकूण फेऱ्या : साधारण 209
