येत्या 6 एप्रिलला दहिसर पूर्व ते काशिगाव या मेट्रो स्थानकादरम्यान पहिल्या टप्प्याच्या मेट्रो मार्गिकेचं उद्धाटन केलं जाणार आहे. या मेट्रो सेवेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. 'मुंबई न्यूज' नावाच्या सोशल मिडिया पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तिथले स्थानिक रहिवासी मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर 'पेणकर पाडा' नावाचा कागदी फलक लावताना दिसत आहेत. इतकेच नाही, तर मेट्रो लाईन सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने नाव दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला असल्याचेही त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 9:04 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Metro 9 सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात, 'पांडुरंग वाडी' स्थानकाच्या नावावरून स्थानिक संतापले
