हार्बर लाईनवरील महत्त्वाची बातमी
हार्बर लाईनवर ते स्थानक म्हणजे सीवूड्स-दारावे. आता हे स्थानक 'सीवूड्स-दारावे-करावे' या नावाने ओळखलं जाणार आहे. स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर घेण्यात आला आहे. हार्बर लाईन नवी मुंबईला मुंबई महानगरातील शहराशी जोडते म्हणूनच लोकल भागांचा विचार करून हे नवीन नाव देण्यात आलंय.
">http://
advertisement
सीवूड्स हा भाग जवळच्या हौसिंग सोसायटीचा निर्देश करतो तर दारावे आणि करावे ही आसपासची गावंची नावे आहेत. त्यामुळे नव्या नावात तीनही ठिकाणांचा समावेश करण्यात आलाय.
यातही स्टेशनचा कोडही आधीचा SWDV बदलून आता नवीन SWDK करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बदलाची पुष्टी केली असून नवीन नाव आणि कोड लगेच स्टेशन बोर्ड आणि रेल्वेच्या अधिकृत यादीत टाकले जाणार आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News : रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; मुंबईतील आणखी एका स्टेशनच नाव बदललं
