TRENDING:

Central Railway : प्रवासाचा वेग वाढणार, वेळ वाचणार! मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबई-पुणे अंतर होणार कमी

Last Updated:

Central Railway : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मोठ्या निर्णयामुळे कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या तसेच मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आता अधिक वेळेवर धावणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कल्याण ते लोणावळा या दरम्यानच्या मार्गावर तब्बल दहा रेल्वे फाटक कायमची बंद करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल तर काही ठिकाणी रुळांखाली बोगदे उभारले जातील. या कामामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा अधिक सुरळीत होईल.
News18
News18
advertisement

प्रवासातील अडथळे कायमचे मिटणार

प्रत्येक वेळेला रेल्वे फाटकांमुळे रेल्वेचा वेग कमी करावा लागतो आणि वेळही वाया जातो. साधारण जर पाहिले तर एका फाटकावर 8 ते 10 मिनिटांचा उशीर होतो, त्यामुळे या फाटकांच्या जागी पूल आणि बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी सुमारे 183 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

advertisement

कर्जत-खोपोली लोकल आता वेळेवर धावणार

महत्त्वाचे म्हणजे घेतलेल्या या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत तसेच खोपोल दरम्यान दररोज धावणाऱ्या लोकल गाड्यांना याचा मोठा फायदा होईल. शिवाय मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचाही आणखी वेग वाढेल. अजून एक गोष्ट म्हणजे रेल्वे फाटक कायमचे बंद झाल्याने अपघातांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

advertisement

पुल कुठे उभारले जाणार आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाअंतर्गत भिवपुरी-कर्जदरम्यान तीन तर बदलापूर-वांगणीदरम्यान दोन आणि वांगणी-शेलूदरम्यान दोन, नेरळ-भिवपुरीदरम्यान दोन तसेच शेलू-नेरळदरम्यान एक असे तब्बल दहा पूल उभारले जाणार आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway : प्रवासाचा वेग वाढणार, वेळ वाचणार! मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबई-पुणे अंतर होणार कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल