TRENDING:

MHADA Home : खुशखबर! मुंबई घ्या हक्काचे घरं; म्हाडाची पुन्हा एकदा लॉटरी; कुठे किती घरं?

Last Updated:

Mumbai Mhada Lottery : मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे म्हाडाकडून पुन्हा एकदा लॉटरी जाहीर होणार असून विविध भागांत शेकडो घरे उपलब्ध होणार आहेत. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या घरांचा समावेश असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : म्हाडा कायमच सर्वसामान्यांचे कमी किंमतीत हक्काचे घर घेण्याचे स्वप्व कायमच पूर्ण करत असतो. त्यामुळे म्हाड्याच्या लॉटरी येण्याची प्रतिक्षा प्रत्येकाला कायमच असते.पुन्हा एकदा म्हाडाची लॉटरी निघाली आहे. मात्र या लॉटरी वेळी काही बदल झालेला आहे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना म्हाडाची भेट
घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना म्हाडाची भेट
advertisement

म्हाडा काढणार 900 घरांची लॉटरी

जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीच्या प्रकल्पामुळे म्हाडाला मोठा फायदा होणार आहे. ज्यात जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास लवकरच सुरु होणार आहे ज्यात तेथील रहिवाशांना नव्या आणि मोठ्या सुसज्ज घर मिळणार आहेत.

नेमका म्हाडाला कसा होणार फायदा?

या वसाहतीची एकूण जागा सुमारे 27 हजार 625 चौरस मीटर इतकी आहे. त्यातील निम्म्या जागेवग सध्या राहत असलेल्या रहिवाशांसाठी पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत. तर अर्ध्या जागेवर विक्रीसाठी नवीन घरे बांधली जातील, त्यामुळे म्हाडाला सुमारे 800 ते 900 घरे ही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

advertisement

जोगेश्वरीमधील ही वसाहतीचे बांधकाम हे 1990 च्या दशकात झाले होते. तिथं सध्या 17 इमारती असून त्यात 942 निवासी आणि 42 व्यावसायिक गाळे आहेत. पण आता या सर्वांचा एकत्रिकच पुनर्विकास केला जाणार आहे.

नवी घर कसे असतील?

मिळालेल्या माहितीनुसार,पुर्नविकासानंतर बांधलेली घरे ही 450 चौरस फुटांची नवीन घरे मिळतील. शिवाय विक्रीसाठी ज्या 17 इमारती बांधण्यात येथील.त्यामध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी साधारण 550 घरे तर अल्प उत्पन्न गटासाठी 300 ते 350 घरे असतील, अशी माहिती समोर आली आहे.

advertisement

लॉटरी पद्धतीने घरांची विक्री होणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अवकाळी पावसाने नुकसान झालं पण हार नाही मानली, केली टरबूज शेती, 8 लाखांचा झाला नफा
सर्व पहा

ही मिळणारी घरी लॉटरी पद्दतीने विकली जातील. शिवाय या प्रकल्पात 450 ते 650 चौरस फुटांच्या दोन प्रकारच्या घरांचाही समावेश असणार आहे. फनेल झोन अर्थात विमानतळाजवळील असा परिसर जिथे इमारतींच्या उंचीवर सुरक्षिततेसाठी मर्यादा घातल्या जातात. त्यामुळे त्या इमारती या 55 ते 56 मीटर उंची पर्यत मर्यादित असतील. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा खर्च सुमारे 450 कोटी रुपये आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Home : खुशखबर! मुंबई घ्या हक्काचे घरं; म्हाडाची पुन्हा एकदा लॉटरी; कुठे किती घरं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल